सिद्धार्थ नाईट हायस्कूल, संगमनेर येथे ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान ' अंतर्गत 'कचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम' उत्साहात पार पडला.
संगमनेर ( भारत रेघाटे )
“संस्कारांची सुरुवात शाळेतून होते; आणि संस्कारित विद्यार्थीच सक्षम समाज घडवतात,” असे मत छात्रभारतीचे अनिकेत घुले यांनी व्यक्त केले.

बहुजन शिक्षण संघ संचलित सिद्धार्थ नाईट हायस्कूल, संगमनेर येथे ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान – नागरी 2.0’ अंतर्गत कचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. संगमनेर नगरपालिकेचे स्वच्छता दूत व प्रशिक्षक तसेच छात्रभारतीचे सक्रिय कार्यकर्ते अनिकेत घुले व मोहम्मद तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
स्वतःचे घर आणि परिसर जसा स्वच्छ ठेवतो, तशीच जबाबदारी शाळा आणि शहराप्रती आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देत त्यांनी संविधानातील नैतिक मूल्ये, कर्तव्य-हक्क यांचा संबंध याबाबतही प्रभावी मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास जगताप सर यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट समजावून सांगत उपस्थितांचे स्वागत केले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावरील उपस्थिती कार्यक्रमाला उत्साहवर्धक होती.

अतिशय सुंदर, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या उपक्रमाच्या यशाबद्दल विद्यालयाचा विशेष गौरव करण्यात आला. विद्यालयाच्या सामाजिक योगदानाबद्दल आणि गुणवत्तेबद्दल उपस्थितांकडून विद्यालयाबद्दल स्तुती करण्यात आली. शाळेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र व स्वच्छतेच्या बॅगा देऊन सन्मानित करण्यात आले.



