प्रवरातीरी चाले गंजिफा खेळी; दहा जणांना पकडत 5 लाख 11 हजार 200 केले हस्तगत
संगमनेर प्रतिनिधी
शहर पोलिसांनी संगमनेर खुर्द येथील प्रवरा नदीवरील पुला जवळील एका शेडवर छापा टाकून गंजिपा खेळणारे दहाजण ताब्यात घेत 5 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार, 22 जून रोजी अनिल एकनाथ राक्षे, संगमनेर खुर्द, शिवाजी छब्बू चव्हाण, संगमनेर, शाम दामोदर बेल्हेकर, संगमनेर वाहिद अजीज पठाण, घुलेवाडी, राजेंद्र तुकाराम जोर्वेकर, घुलेवाडी, रामराम पवार, रा. संगमनेर, तुळशीराम दादा वाळूंज कोल्हेवाडी, अक्षय पंढरीनाथ वाघमारे संगमनेर, सुरज प्रताप कतारी, अक्षय उर्फ मोबी कतारी संगमनेर हे तिरट नावाचा हारजी तिचा खेळ खेळताना पोलिसांना सापडले. याप्रकरणी शहर पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आत्माराम पवार यांनी फिर्याद दिली असून शहर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

