ब्रेकिंग न्यूज :
भारत

पार्ट ऑफ लाईफ बनवा ;- डॉ. तांबे

Blog Image
एकूण दृश्ये: 42

पार्ट ऑफ लाईफ बनवा ;- डॉ. तांबे ;                             

 { दुर्लक्ष करून कसे चालेल ? }

      संगमनेर (प्रतिनिधी) 

शरीर उत्तम आणि निरोगी राहण्यासाठी आपण प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या तो धर्म आहे . नैमित्तिक कामे आपण सातत्यपूर्ण करत असतो मग योगाकडे दुर्लक्ष करून कसे चालेल योगावरच आपले शरीर अवलंबून असून आपलं निरोगी आयुष्य त्यावरच अवलंबून आहे वीस मिनिटं आपण योगासनासाठी दिलेच पाहिजे. योग ही आपली जीवनशैली पार्ट ऑफ लाईफ झाली पाहिजे असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ते विद्यार्थी आणि समूहाला मार्गदर्शन करताना बोलत होते. ते म्हणाले की योगामुळेच शरीर लवचिक होते. व्यायामाचे अनेक प्रकार आहेत मन आणि शरीराला जोडण्याचं काम योग करत असतो. योगात जोडण्याचे सामर्थ्य आहे. योगाला आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही महत्त्व प्राप्त झाले असून  हृदयरोग, रक्तवाहिन्या, ब्लॉक होणे अशा अनेक अनेक आजारांवर मात करण्याचे सामर्थ्य योगामध्येच आहे.

----- Advertisements -----

अनेक पुस्तकाचा संदर्भ देत निरोगी शरीराबद्दल माहितीचे विश्लेषण तांबे यांनी विषद केले. यासाठी आहार विहार निद्रा आणि योग याचे आपण महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. सूर्यनमस्काराला आपण प्राधान्य दिलेच पाहिजे. योग करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने शपथ घेतली पाहिजे आणि त्याचे पालन केले पाहिजे असेही ते म्हणाले.

एकविरा फाउंडेशन तसेच युवा युवा काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, योगा हा जगाला मिळालेली देणगी आहे. योगाचा उगम भारतात झाला. योगाने शरीरच नाही तर मन आणि आत्म्याचा मेळ जुळतो. प्रत्येक व्यक्तीनै योगाचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योगाचा फायदा होतो. योगाने स्मरणशक्ती वाढते. क्रीडाच नव्हे तर अनेक क्षेत्रात आपल्याला योगामुळे प्रावीण्य मिळवता येते. कारण योगामुळे मानसिक स्वास्थ्य ठीक राहते चंचलता येते आणि योगामुळे आपल्या बुद्ध्यांकही वाढतो असे डॉक्टर जयश्री थोरात यांनी सांगितले. योग दिना त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. योगा हा एका दिवसासाठी नसून संपूर्ण वर्षभर आणि आयुष्यभर योगा केला पाहिजे. स्वतःसाठी वेळ काढा. योगासाठी वेळ काढणे हे आपल्या हितासाठीच आहे. मन आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योगा अत्यंत गरजेचा असून स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा असा सल्ला डॉक्टर जयश्री थोरात यांनी दिला.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या ३५०० विद्यार्थी व एकवीरा आणि जयहिंद लोक चळवळीच्या ५०० युवकांनी एकत्रित योगाचे विविध प्रकार करत योग दिन साजरा केला. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन व विद्यार्थ्यांना योगाचे धडे किशोर देशमुख यांनी दिले. प्रास्ताविक आचार्य बाबुराव गवांदे यांनी केले. सूत्रसंचालन डी. व्ही. गुंजाळ यांनी केले तर प्राचार्य के.जी. खेमनर यांनी आभार मानले. यावेळी शहरातील व ग्रामीण भागातील युवक कार्यकर्ते, महिला, तसेच सह्याद्री शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी एकवीरा फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना पौष्टिक डिंक लाडूचे वाटप करण्यात आले.

----- Advertisements -----

 

स्वतःला ओळखणे हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे.

महात्मा गांधी