मराठी भाषिकांच्या अस्मितेशी खेळू नका : अमर कतारी
मराठी भाषेचे अस्तित्व जपण्यासाठी उध्दव गटाचे निदर्शने
संगमनेर { भारत रेघाटे }
शहर शिवसेनेच्या वतीने राज्य शासनाच्या हिंदी भाषे बाबतच्या शासन निर्णयाला विरोध करत उद्धव गट शिवसेनेच्या वतीने बस स्थानकासमोर निदर्शने करत होळी करण्यात आली.

प्राथमिक शालेय शिक्षणात हिंदी विषय सक्तीचा किंवा ऐच्छिक वरून संभ्रम निर्माण करुन मराठी भाषिकांच्या स्वाभिमानाशी खेळू नये असे परखड मत अ माजी शहर प्रमुख शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमर कतारी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते पाचवी वर्गामध्ये तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषेचा शासन निर्णय लागू केला असून सरकारच्या म्हणण्यानुसार हा विषय सक्तीचा नसून ऐच्छिक असल्याचे सांगितले गेले असले तरी वर्गातील किमान २० विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन ‘हिंदी नको’ अशी इच्छुकता दर्शवल्यास इतर भाषा उपलब्ध करुन देण्यात येईल. असा संभ्रम निर्माण करणारा निर्णय राज्य सरकार कसा घेऊ शकते ? मुंबई सह संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी प्राणाचे बलिदान दिले. मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी अतोनात परिश्रम केले. त्याच राज्यात मराठी भाषेचा होणारा दुस्वास आम्ही कसा खपवून घेऊ ? महाराष्ट्राच्या व्यवस्थेवर हळूहळू हिंदी लादून मराठी भाषिकांवर एकप्रकारे दबाव निर्माण करण्याचे हे षड्यंत्र असून महाराष्ट्रात फक्त मराठीचेच प्राधान्य राहील. प्राथमिक शालेय शिक्षणात हिंदी विषय सक्तीचा किंवा ऐच्छिक वरून संभ्रम निर्माण करुन सरकारने मराठी भाषिकांच्या स्वाभिमानाशी खेळू नये अन्यथा ठाकरे बंधूंच्या मनोमिलना नंतर ही महाराष्ट्राची वज्रमूठ तुम्हाला अस्मान दाखवेल असा इशाराच शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिला. संगमनेर तालुक्यातील शिव सैनिकांना घेऊन संगमनेर बस स्थानक समोर शासन निर्णयाची होळी केली. ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात मुंबईत मराठी अस्मितेच्या सन्मानार्थ निघणारा महामोर्चा हा मराठी जनांची ताकद काय असते हे महाराष्ट्र दाखवून देईल असे युवासेना जिल्हा प्रमुख अमित चव्हाण शहर संघटक असिफ तांबोळी यांनी मत व्यक्त केले. महाराष्ट्रात शेकडो वर्षांपूर्वी गुजराती, मारवाडी, राजपूत, राजस्थानी, शीख, पंजाबी बांधव महाराष्ट्रात स्थलांतरीत झाले ते मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झाले स्व भाषा अभिमान राखत इतर भाषीय बांधवांनी मराठीला तेवढाच दर्जा आणि प्रेम दिले. असे मत युवा सेना शहर प्रमुख गोविंद नागरे उप तालुका प्रमुख सचिन साळवे यांनी व्यक्त केले. उत्तर भारतातील काही मुजोर आणि मराठीचा दुस्वास करणाऱ्या नागरिकांचा लांगूलपणा करण्यास तसेच ‘महाराष्ट्राचे हिंदीकरण’ करण्याचा घाट घातला जातोय असा सवाल उपस्थित शिवसैनिक युवा सेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद विधानसभा प्रमुख अमोल डुकरे यांनी व्यक्त केला. यावेळी मुस्लिम मावळा अजीज मोमीन यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
माजी.शहरप्रमुख-अमर कतारी युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, जिल्हा समन्वयक-फैसल सय्यद युवा सेना शहर प्रमुख गोविंद नागरे विधानसभा प्रमुख अमोल डुकरे मुस्लिम मावळा-अजिज मोमीन, शहर समन्वयक असिफ तांबोळी,, उपतालुकाप्रमुख-सचिन साळवे ,बाजार समिती सदस्य विजय सातपुते भाऊसाहेब वराळे प्रकाश गायकवाड अमित फटांगरे !विभागप्रमुख प्रंशात खजुरे, नितिन गुंजाळ ,भोला पवार सचिन खिच्ची शुभम काळे, महेश कतारी, दशरथ पवार, सागर कतारी,गौतम खिच्ची करण सदमाके व शिवसैनिक उपस्थित होते.
