बीजेपी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी रोहीत चौधरी
संगमनेर प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी उत्तर अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी अहिल्यानगर, उत्तर जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. यामध्ये संगमनेरचे युवा नेतृत्व असलेले रोहित राजेश चौधरी यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे..

रोहित चौधरी यांनी यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे पासून विद्यार्थी चळवळीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सहा वर्षे विद्यार्थी परिषदेचे काम केल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय सदस्य म्हणून ते कार्यरत झाले. सुरुवातीला भारतीय जनता पक्षाच्या बूथ अध्यक्ष, तसेच संगमनेर शहर बूथ संयोजक, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या चौधरी यांनी सांभाळल्या आहेत.
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्या मध्ये भाजपा युवा मोर्चाचे संघटन वाढी बरोबर युवकांचे प्रश्न, सरकारी योजना, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महा- युतीचा झेंडा फडकवण्यासाठी हा युवा मोर्चा पूर्ण ताकदीने काम करेल असा विश्वास रोहित चौधरी यांनी व्यक्त केला.
रोहित चौधरी यांच्या निवडीबद्दल अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे, माजी आमदार वैभव पिचड, आमदार अमोल खताळ, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवडी विषयी चौधरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव पडत असून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
