ब्रेकिंग न्यूज :
भारत

बिबट्याचा हल्ला; 74 वर्षांची महिला गंभीर

Blog Image
एकूण दृश्ये: 265

बिबट्याचा 74 वर्षांच्या महिलेवर हल्ला; चेहरा फाडला झटापटीत अंगठा तुटला; स्कार्फने वाचला जीव; बिबट्याची दहशत ठरते जीवघेणी

     संगमनेर : भारत रेघाटे

तालुक्यातील रहीमपूर येथे बिबट्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात 74 वर्षीय महिलेचा अर्धा चेहरा फाडल्याने एक ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाली आहे. या हल्यात अरुणा रामनाथ शिंदे 74 असे महिलेचे नाव असून रात्री झोपेतच बिबट्याने या महिलेच्या चेहऱ्यावर हल्ला करत गंभीर दुखापत केली असून सदर महिलेची चेहऱ्या कडील डावी बाजू आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली  झटापटीत या महिलेचा डाव्या हाताचा अंगठाही तुडला आहे.

     रहीमपूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पाठीमागील बाजूस आणि भरवस्तीत रामनाथ लक्ष्मण शिंदे यांचे घर आहे. घराजवळ गोठा आहे. गोठ्याच्या शेजारी ओढा आणि ओढ्याच्या पूर्वेला शेत जमीन आहे. मंगळवारी सायंकाळी अरुणा शिंदे यांनी पती रामनाथ, मुलगा तात्याभाऊ, सुन आणि नातवंडांसोबत जेवणांनतर कुटुंब घरात झोपी गेले अरुणा आणि त्यांचे पती रामनाथ हे घराजवळच्या पडवीत झोपले होते. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पडवीच्या पूर्वेला असणाऱ्या ओढ्याकडून बिबट्याने शिंदे दांम्प्यत्य झोपलेल्या पडवीत प्रवेश केला. आणि झोपलेल्या अरुणाबाईवर हल्ला चढवला. झोपेतच हल्ला झाल्याने त्यांनी मोठ्याने आरडा ओरड केल्यावर त्यांचे पती रामनाथ जवळच असणाऱ्या काठीने बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी घरातून सून आणि मुलगा धावत आले. वस्तीवरील इतर लोकही धावत आल्याने बिबट्याने धूम ठोकत पळाला. या दुर्घटनेत अरुणाबाईच्या चेहऱ्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. एका बाजूचा बिबट्याने पूर्णपणे डावा गाल फाडला तर, डोळ्या भोवतीही गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. बिबट्याला प्रतिकार करताना अरुणाबाई यांचा डाव्या हाताचा अंगठा बिबट्याच्या जबड्यात सापडल्याने तो तुटून खाली पडला. अरुणाबाईने स्कार्फ बांधलेला होते. बिबट्याच्या हल्ल्यात डोक्याचे स्कार्फ गळ्याजवळ आल्याने महिलेचा जीव वाचला.  या घटनेत सदर महिला गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर नातेवाईकांनी  तात्काळ लोणी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना अहिल्यानगर सिव्हिल रुग्णालयात पाठवले. तेथील डॉक्टरांनी ही अरुणाबाई यांच्या चेहऱ्यावर टाके टाकता येणार नाही, त्यांची प्लास्टिक सर्जरी करावी लागेल असे सांगत पुणे, नाशिक किंवा मुंबईला हलवण्याचा सल्ला दिला. या घटनेने रहीमपूर परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून या बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. वनविभागाचे भाग दोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार माहिती मिळताच  वनपाल रमेश पवार, वनरक्षक राहुल सातपुते, पोलीस मित्र रोहिदास माळी यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले. पिंजरे लावणार असल्याचे केदार यांनी माहिती दिली. दरम्यान घटनेची माहिती समजताच थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी भेट घेतली. 

----- Advertisements -----

धोका टळला परंतु महिला अत्यवस्थ ; डॉ. अमोल कर्पे

अरुणा रामदास शिंदे वय वर्ष 74 रहिमपूर ह्या बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या होत्या. तत्पूर्वी नातेवाईकांनी नगर येथील सिव्हिल रुग्णालयात त्यांना भरती केले होते. परंतु सदर रुग्णालयाने त्यांना संगमनेर येथे उपचारार्थ पाठविले. डॉ. अमोल कर्पे साईनाथ रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू असून प्राथमिक सर्जरीही करण्यात आली आहे. फिजिकल फिटनेसनंतर  महिलेची प्लास्टिक सर्जरी करावी लागणार असल्याचे डॉ. कर्पे यांनी सांगितले. पुढील धोका टाळला असला तरी महिलेची तब्यैत अत्यवस्थ असल्याचे डॉ  कर्पे म्हणाले.

श्रम हेच यशाचे खरे साधन आहे.

लोकमान्य टिळक