जिद्दीचा प्रवास, विश्वासाचे नेतृत्व : रवींद्र (पप्पू) कानकाटे यांची प्रेरक वाटचाल
----- नेतृत्व हे पदावरून नव्हे, तर प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या निर्णयांवरून घडते. संघर्ष, सातत्य आणि पक्षनिष्ठा यांच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे रवींद्र (पप्पू) कानकाटे हे संगमनेरच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील ठाम आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत.

सामान्य कुटुंबात वाढताना त्यांनी लहान वयातच जबाबदाऱ्यांची जाणीव स्वीकारली. १९९८ मधील अतिक्रमण कारवाईत कुटुंबाचा व्यवसाय कोलमडला, तेव्हा आयुष्याने मोठे वळण घेतले. मात्र या धक्क्याने खचण्याऐवजी त्यांनी परिस्थितीला सामोरे जाण्याचा मार्ग निवडला. शिक्षणासोबत विविध कष्टाची कामे करत त्यांनी जीवनातील संघर्ष जवळून अनुभवला. हाच अनुभव पुढे त्यांच्या नेतृत्वाचा पाया ठरला. रवींद्र उर्फ पप्पू हे युवा नेतृत्व कानकाटे घराण्याला उभारी देणारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दोन गोष्टी ठळक दिसतात एक म्हणजे अढळ पक्षनिष्ठा आणि दुसरे म्हणजे संघटन कौशल्य. युवकांमध्ये संवाद साधण्याची त्यांची पद्धत, कार्यकर्त्यांना सोबत घेण्याची वृत्ती आणि निर्णयक्षम भूमिका यामुळे त्यांचा प्रभाव वाढत गेला. २००७ पासून त्यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देत स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत केले. विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी केवळ पद भूषवले नाही, तर त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
शाखाप्रमुख ते प्रभारी शहर प्रमुख, युवक सेना विभाग प्रमुख अशा विविध पदाच्या भूमिका पार पाडताना त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली. आंदोलन असो किंवा सामाजिक उपक्रम त्यांनी प्रत्येक ठिकाणी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या कार्यपद्धतीचे विश्लेषण केले तर असे दिसून दिसते की, ते भावनांपेक्षा नियोजनाला आणि घोषणांपेक्षा कृतीला प्राधान्य देतात. जमिनीवरील वास्तव समजून घेत निर्णय घेणे, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि जनतेशी थेट संवाद साधणे ही त्यांची कार्यशैली आहे. आज पप्पू कानकाटे हे केवळ युवा नेता म्हणून नव्हे, तर सक्षम, अभ्यासू आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. संघर्षातून उभे राहिलेल्या या नेतृत्वाची वाटचाल पुढील काळात स्थानिक राजकारणात अधिक ठसा उमटवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या वाढदिवसा निमित्त अनेक सदिच्छासह पुढील वाटचाल सुकर होवो !
