धाडसी रॉबरीचा बनाव : फिर्यादीच निघाला गन्हेगार, शेतीमालाची चोरी, मालही परस्पर विकला ; साडे पंधरा लाखाच्या मुद्येमालासह चौघांना जेलची हवा
संगमनेर { प्रतिनिधी }
कटकारस्थान रचून पोलिसांना खोटी माहिती देत फिर्याद देणा-या टोळीचाच मोर क्या पोलिसांच्या तावडीत आल्याने घारगाव पोलिसांना या घटनेचा पर्दाफाश करण्यात यश आले असून मुद्देमालासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
सदर घटने बाबतची हकीकत अशी आहे की, तीन आठवड्यापूर्वी शुक्रवार दि .31 जानेवारी 2025 ला रोजी मध्यरात्री फिर्यादी दीपक किसन कदम, वय 42 वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. राजगुरूनगर वाडा रोड जि. पुणे हे 5,72,214 किंमतीची शेतीची औषधे भरलेली पिकअप गाडी क. एम.एच. 42 एक्यु, 8278 घेवून पुण्याहून नाशिककडे जात असताना त्यांना चाळकवाडी टोल नाका येथून दोन प्रवाशांनी लिफ्ट मागितली त्यांना घेवून ते घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत माहुली घाट खंदरमाळ या ठिकाणी आले असता रात्री साडेतीनच्या सुमारास एकास लघुशंका लागल्याने गाडी थांबवली त्यावेळी गाडीत बसलेल्या दुस-याने गावठी कट्टा काढून चालकाला लावला. खाली उतरलेला दुसरा इसम ड्रायवरच्या बाजूने चढला त्याने नाकास रूमाल लावलयाने तो बेशुध्द झाला त्यानंतर फिर्यादीला सकाळी शुध्द आली असता तो माल शोधत होता परंतु गाडीमध्ये शेती मालाचे कोणतेही औषध आढळले नसल्याने त्याने गाडी मालकाला फोन करून सदर घटना कळविली व आळेफाटा पोलीस स्टेशन येथे जावून फिर्याद दिली.
फिर्यादीवरून आळेफाटा येथे नंबर गुन्हा दाखल करण्यात होता. परंतु ,पुढील कार्यवाहीसाठी घारगाव पोलीसाकडे तो वर्ग केल्याने घारगाव पोलीसात सदर गुन्ह्याचा प्रकार हा गंभीर असल्याने तो उघडकीस आणण्याबाबत पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. सदर गुन्हयाच्या तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांचेकडे दिला. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी दिलेल्या फिर्याद प्रमाणे हकिगत समजून घेवून घटनाक्रम तपासला. तसेच हिवरगाव पावसा टोलनाका, चाळकवाडी टोलनाका येथील सिसिटीव्ही ( क्लोज सर्किट टेलीविजन) तपासण्यात आले. फिर्यादींचे मोबाईल क्रमांकाचे सिडीआर कौल डिटेल्स रेकॉर्ड काढण्यात आले, त्यावरून तांत्रिक विश्लेषण करून इतर संशयीत आरोपींबाबत माहिती प्राप्त करून त्यांचे मोबाईल क्रमांकांचे सिडीआर काढुन त्याबाबत तपास करण्यात आला.
त्यानुसार तांत्रिक विश्लेषण करून प्राप्त माहितीच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार रोहकल, चाकण, ता. खेड, जि. पुणे येथे पोलीस पथकाने आरोपी साईदास रघुनाथ गाडेकर, वय २७ रा. रोहकल, चाकण, ता. खेड, जि. पुणे. मुळ रा. निमगाव निघोज, ता. राहाता. जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेवून त्याचेकडे तपास केला. तद्नंतर घटनेची उकल करण्यात आली. सदरचा गुन्हा त्याचे इतर तीन साथीदार दीपक किसन कदम,42 रा. वाडा, राजगुरूनगर, जि. पुणे , तेजस प्रकाश कहाणे, वय 21 रा. वाडा, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे, नवनाथ दादाभाऊ शिंदे, वय 28 रा. रोहकल, चाकण, ता. खेड, जि. पुणे यांच्या संगनमताने केला तसेच त्याचे कडून गुन्हयातील जबरी चोरी गेलेला माल गाडी क. एम.एच.42 एक्यु. 8078 यामध्ये मिळून आल्याने त्याबाबत पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून तो जप्त करण्यात आला आहे. त्यानुसार इतर आरोपी यांना देखील ताब्यात घेण्यात आले.
त्यानुसार आरोपी दीपक किसन कदम हेच गुन्हयातील फिर्यादी मुख्य असल्याने गुन्ह्याबाबत सखोल तपास केला असता त्याने देखील गुन्ह्याची कबुली दिल्याने या चौघांवर भा.न्या.सं. कलम 309 (4),3 (5) सह शस्त्र अधिनियम कलम 3,15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवून अटक करण्यात आली आहे. आरोपींना संगमनेर न्यायालया समक्ष हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर आरोपींकडुन गुन्हयातील पिकअप गाडी, 5 मोबाईल , 5,72,214 किंमतीची शेतीची औषधे असा एकूण 15,12,214- पंधरा लाख बारा हजार दोनशे चौदा रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधीकारी डा. कुणाल सोनवणे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस हवालदार एकनाथ खाडे, चांगदेव नेहे, सुभाष बोडखे, समर्थ गाडेकर यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे हे करीत आहेत.