गुन्हेगारी

मंत्री डॉ. विखे पाटील, पोलीस उपाधीक्षक डॉ. सोनवणे यांच्या समोर घडला प्रकार ; छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांना शिवसेना- भाजपच्या कार्यकर्त्यांची मारहाण ; निवेदन देतांना नगर पालिका आवारात झाली धराधरी मारामारी

Blog Image
एकूण दृश्ये: 628

मंत्री डॉ. विखे पाटील, पोलीस उपाधीक्षक डॉ. सोनवणे यांच्या समोर घडला प्रकार ; छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांना शिवसेना- भाजपच्या कार्यकर्त्यांची मारहाण ; निवेदन देतांना नगर पालिका आवारात झाली धराधरी मारामारी

   संगमनेर ( प्रतिनिधी ) 

बीजेपी चे नितेश राणे यांच्या व्यक्तव्याने समाजात तेढ निर्माण होत असून. या वक्तव्यास प्रशासन स्तरावर पायबंद बसावा, तसेच बेताल बोलणा-या राणे यांचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा यासाठी छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांनी निवेदन देताना शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्याकडून त्यांना मारहाण झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत अधिक माहिती अशी आहे की, छात्र भारतीचे अनिकेत घुले ,राम सयाजी अरगडे, राहुल ज-हाड मोहमंद कैफ अजीम तांबोळी यांनी 

नगरपालिका आवारात  

जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने भा.ज.पा. चे नितेश राणे यांनी हिन्दु मुस्लिम वाद निर्माण करणारी वक्तव्ये करीत आहे. त्यामुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण होवून समाजा समाजात वितुष्ट निर्माण होत असल्याचे सांगत त्या विरोधात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यासाठी छात्र भारती संघटनेचे कार्यकर्ते गेले असता. भा.ज.प शिवसेना कार्यकर्ते दिनेश फटांगरे, शशांक नामण, रमेश काळे, भैय्या सातपुते, विनोद सूर्यवंशी, राहुल भोईर, यांनी आम्हास बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर आमच्या पोटात बुक्या आणि लाथा तसेच डोके कानावर जबरदस्त मारहाण केली. तसेच जबरदस्तीने दोघांचे मोबाईल काढून घेतल्याचे सांगत शहर पोलिसात तक्रार दाखल केली असता सदर व्यक्तींंवर गुन्हा दाखल करण्यास विलंबाने ओनलाइन तक्रार दाखल केल्याचे घुले यांनी सांगितले. राम अरगडे, मोहमंद कैफ अजीम तांबोळी यांचे मोबाईल एका लेडीजने खिशातुन जबरदस्तीने हिसकावुन दिनेश फटांगरे यांचे ताब्यात दिल्याचे म्हटले आहे. तसेच आम्हांला अश्लील शिव्या दिल्या, यापुढे पुन्हा निवेदन देण्यांचे भानगडीत पडले तर तुम्हांला कायमचा धडा शिकवू असा सज्जड दमही दिला. घटना घडतेवेळी दस्तुरखुद पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. अमोल खताळ, विभागिय अधिकारी शैलेश हिंगे, तहसिलदार धीरज मांजरे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे ,यांच्या समोरच सदरचा प्रकार घडल्याने शहर तालुका परिसरात चर्चेला उधान आले आहे. तसेच सोशल मिडियावरुन धमकी दिल्याचे छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांचे म्हटले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 

.

संपत्तीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे.

शिवाजी महाराज
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin