कोंचीत अवैध मुरम चोरी, हायवा लावला पोलिस वसाहतीत ; पोकलेन आदींबाबत पंचनामा सुरू; महसुल प्रशासानाची दमदार कार्यवाही
संगमनेर
तहसील हद्यीतील कोंची गावातील डोंगरातून मुरुम तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून या परिसरातून तस्करांनी हजारो ब्रास गौन खनिज चोरून नेले आहेत. शनिवारी दुपारी पोकलेन डंपरच्या साहाय्याने वाहतूक सुरू होती. या घटनेची माहिती मिळताच संगमनेरच्या महसूल प्रशासनाने हायवा डंपर जप्त केला असून पुढील पंचनामा सुरू आहे. अनेक दिवसांपासून या परिसरात गौण खनिज तस्करांची ग्रामस्थांनी पुराव्यासह माहिती प्रशासनाला दिल्यानंतर प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार डॉ.धीरज मांजरे यांनी कार्यवाही चे आदेश देताच मंडल अधिकारी बी.के. जेडगुले ,तलाठी ए.बी. चिंचोलकर हजर होत कारवाई करण्यात आली असून अवैध मुरम चोरीमध्ये एक हायवा जब्त करून पोलिस वसाहतीत लावला तर पोकलेन आदींबाबत पंचनामा सुरू आहे.
वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खनन करण्यात आले आहे. या ठिकाणी पोकलेन डंपरच्या माध्यमातून राजरोषपणे गौन खनिज नेला जात होता. महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी येताच पोकलेन चालकाने पोकलेन घटनास्थळीच सोडले आणि पळून गेले. त्यानंतर महसूल प्रशासनाने डंपर जप्त करत पोलिस वसाहतीत लावला आहे. राजकीय प्रभावामुळे हे मुरूम तस्कर प्रशासनाचे ऐकत नाहीत. अनेकवेळा त्यांनी महसूल विभागातील कर्मचारी वर्ग व इतर लोकांशी गैरवर्तन केले आहे.
या तस्करांनी संगमनेर तालुक्यातील टेकड्या काबीज करून मोठे जाळे जमा केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हजारोंच्या संख्येने डंपरमध्ये मुरूमची तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे. तालुका पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. हायवाचा मालक गोकुळ साबळे, ड्रायव्हर सागर मोरे हे फरार झाले . कारवाईत महसूल प्रशासनावर मोठा दबाव असल्याचे दिसून येत असले तरी महसूल प्रशासन या दबावाला बळी न पडता ही कारवाई करण्यात आली. या मुरुम तस्करांनी गेल्या दोन महिन्यांपासून कोकणगाव कोंची माचीच्या डोंगरांची अक्षरश: साफ केली आहेत. प्रांत शैलेश हिंगे तहसीलदार डॉ.धीरज मांढरे मंडल यांनी वरील कारवाईचे आदेश दिले. मंडलाधिकारी बी.के. जेडगुले यांनी सांगितले की, हायवा पोलीस वसाहतीत जमा केला असून पुढील पंचनामा करून कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.