विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती ,सम्राट अशोक ,क्रांतीससुर्य महात्मा फुले , छत्रपती शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
संगमनेर प्रतिनिधी
भारतीय बौध्द महासभा आणि वंचित बहुजन आघाडी तालुका संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती तसेच सम्राट अशोक, क्रांतिसूर्य महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
जयंती महोत्सवाच्या निमित्ताने होणा-या विविध कार्यक्रमामध्ये रविवार, दि. १३ रोजी रात्री ८ ते ११ या दरम्यान महाराष्ट्राचे सुप्रसिध्द विद्रोही गीतकार कैलास राऊत, विशाखातई नांदेडकर यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार, दि. १४ एप्रिल सकाळी ११ वा. महामानवाला मानवंदना केल्याच्या नंतर सकाळी ११.३० वा. आप्पासाहेब गायकवाड यांचे "सुशिक्षितांनी मला धोका दिला" या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमा दरम्यान सस्नेह भोजनाची व्यवस्थाही करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष रोहम, तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून उत्कर्षाताई रुपवते राज्य प्रवक्त्या, वंचित बहुजन आघाडी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.
त्याचप्रमाणे इंजि. शितलताई साठे (यादव) , मा.देशमुख साहेब , संज्योत वैद्य , मा. सुभाष कदम ,मा. शांताराम रणशूर , मा.विशाल कोळगे यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजक आणि निमंत्रक डी. के. जाधव साहेब ,प्रा.अनिल मुन्तोडे सर , संजय कुमार शिंदे ,संजय भालेराव ,पी. एस. रोकडे सर आदींनी दिनांक 13 आणि 14 एप्रिल या दोन्ही कार्यक्रमांना संगमनेर तालुक्यातील आणि शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.