(शेंडी)भंडारदरा ता. अकोले येथे होणार धम्म यात्रा ; माजी मंत्री दादासाहेब रूपवते यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
संगमनेर [ प्रतिनिधी ]
धम्मयात्रा आणि दादासाहेब रूपवते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ भंडारदरा येथील मूलगंधकुटी , जेतवन ,अकोले येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या धम्म यात्रेच्या निमित्ताने सकाळी दहा वाजता मिलिंद सोनवणे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण होऊन सकाळी ११.०० वाजता धम्मदेसना होईल. यावेळी पुणे येथिल भदंत नागघोष हे उपस्थित राहणार आहे. दुपारी १.०० वाजता सनई , ढोल , लेझीम इत्यादी पारंपारिक वाद्यांच्या सुमधुर आवाजात उपस्थित सर्वच धम्म बांधवांच्या समवेत संपूर्ण शेंडी या गावांमधून मिरवणूक निघणार आहे.
यावेळी अतिथी म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आयु.भीमराव भैय्यासाहेब आंबेडकर - राष्ट्रीय कार्याध्यक्ष - भारतीय बौद्ध महासभा तसेच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ. रावसाहेब कसबे, शिरीष चौधरी माजी आमदार, अमित अशोकराव भांगरे, विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲड. संघराज दादासाहेब रूपवते ही उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे निमंत्रक ग्रामीण विभाग कमिटीचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, कार्याध्यक्ष पोपटराव सोनवणे, सरचिटणीस विनोद गायकवाड, खजिनदार गोरक्ष राऊत तर मुंबई विभाग धम्मयात्रा कमिटीचे प्रकाशराव लहितकर अध्यक्ष ,सुरेश रूपवते, कार्याध्यक्ष सुरेश रोकडे, सरचिटणीस खजिनदार विजय तुकाराम देठे , बहुजन शिक्षण संघ, दादासाहेब रूपवते फाउंडेशन, जीवक मेडिकल सेंटर ,बहुजन सांस्कृतिक केंद्र तसेच बहुजन हितवर्धक संघ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अशी माहिती ॲड. संघराज रुपवते यांनी दिली आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ,वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते ,बहुजन शिक्षण संघाचे अध्यक्ष बी. आर. कदम सर , विश्वस्त एम.डी. सोनवणे सर आदी संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.