कला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात प्राचार्य बी. आर. कदम सर यांचा जीवन गौरवाने होणार सन्मान ; विविध कार्यक्रमाची असणार मेजवाणी

Blog Image
एकूण दृश्ये: 105

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात प्राचार्य बी. आर. कदम सर यांचा जीवन गौरवाने होणार सन्मान ; विविध कार्यक्रमाची असणार मेजवाणी

 संगमनेर प्रतिनिधी 

महामानव प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती महोत्सवाचे संगमनेर येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे (संस्थापक अध्यक्ष कालकथित सर्जेराव गोविंदराव माघाडे) वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वा. अभिवादन सभा होणार असून यावेळी बहुजन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य बी. आर. कदम यांना "जीवनगौरव" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. भिकचंद रभाजी कदम अर्थात बी. आर. कदम सरांचा जन्म संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी या छोट्याशा गावी झाला. शालेय शिक्षण प्राथमिक शिक्षण त्याच गावात पूर्ण करून मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण संगमनेर तालुक्याच्या ठिकाणी पूर्ण केले आणि महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर येथे पूर्ण केले. त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांचे खंदे समर्थक आणि कार्यशील सहकारी म्हणून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. बहुजन शिक्षण संघामध्ये प्राचार्य , विश्वस्त , सेक्रेटरी आणि सध्या बहुजन शिक्षण संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. नगर जिल्ह्यातील फुले -शाहू- आंबेडकर चळवळ ,पुरोगामी चळवळ , डाव्या विचारांची चळवळ हे त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक राहिलेले आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत. 

सकाळी 10 वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. सकाळी 9.15 मिनिटांनी बौद्धाचार्य रावसाहेब पराड हे बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रम सुरू होईल. 9.30 वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तदनंतर जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. 10.00 वाजता प्रा.डॉ. राहुल हांडे यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये राज्याचे माजी महसूल मंत्री, माजी आमदार बाळासाहेब थोरात, विधानसभा परिषदेचे माजी सदस्य डॉ. सुधीर तांबे , विधान परिषदचे सदस्य आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा व एकविरा फाउंडेशनच्या डॉ. जयश्री थोरात, बहुजन शिक्षण संस्थेच्या विश्वस्त उत्कर्षाताई रूपवते ,बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त ॲड. संघराज रुपवते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधाकर रोहम, संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिरालाल पगडाल ,माणिकराव यादव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

----- Advertisements -----

या कार्यक्रमासाठी संगमनेर शहरातील आणि तालुक्यातील ग्रामीण भागातून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे. असे आवाहन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि इतर समिती सदस्यांनी केले आहे.

शिकत रहा, कारण ज्ञान हेच आपले खरे सामर्थ्य आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin