ब्रेकिंग न्यूज :
भारत

डॉ. कासिम ईमामांच्या शायरीत जीवन आणि भावनांचे अद्भुत मिश्रण :- ईद्रिस शेख

Blog Image
एकूण दृश्ये: 204

डॉ. कासिम ईमामांच्या शायरीत जीवन आणि भावनांचे अद्भुत मिश्रण :- ईद्रिस शेख

उर्दू साहित्य समृद्धी बरोबर हिंदू मुस्लिम ऐक्यही जपले

शायरीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

   संगमनेर - प्रतिनिधी 

आज जगात अनेक कवी , शायर आहेत, परंतु मुंबईतील बुरहानी कॉलेजच्या उर्दू विभागाचे प्रमुख राहिलेले आणि जगप्रसिद्ध शायर साहित्यिक प्रा. डॉ. कासिम ईमाम यांची राष्ट्रीय एकात्मता ,मराठी, ऊर्दू ,हिंदी भाषांवर असलेले प्रभुत्व ही एक वेगळी ओळख आहे. जगप्रसिद्ध शायर डॉ. कासिम ईमाम हे हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहेत. 

 

त्यांचा जन्म हैदराबाद मध्ये ५ जून १ झाला. आज त्यांचा वाढदिवस शायरीला वय नसते. ती ऐकण्याची सवय लागली पाहिजे. बाल वयातच डॉ कासिम यांना शायरी करण्याचा छंद लागला. त्यांनी तो जोपासला. शायरी क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान हे तुम्हा आम्हा साठी कायम प्रेरणा देणारे राहील.

 

----- Advertisements -----

     डॉ. कासिम इमाम हे मुंबई विद्यापीठाचे पीएच.डी चे मार्गदर्शक तर उर्दू विभागाचे प्रतीक मानले जातात. दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, राज बब्बर यांसारख्या अनेक दिग्गजा सोबत जवळचे संबंध आहेत. डॉ. कासिम इमाम यांनी शाहरुख खानच्या उपस्थितीत अनेक मुशायऱ्यांचे आयोजन केले आहे. प्रत्येक ईदला दिलीप कुमारच्या घरी दिवसभर त्यांच्या सोबत बसत असत. त्यांच्या गझ़ल ऐकून आनंदीही घेत असत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी "इंसान की तलाश में" हे संस्कृत मधील पुस्तक लिहिले. डॉ. कासिम इमामांनी त्याचे उर्दू भाषांतर केले. यांच्याच विनंतीवरून अमिताभ बच्चन यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कासिम इमाम यांनी केले. जॅकलिन फर्नांडिस, कार्तिक आर्यन, वरुण धवन, टायगर श्रॉफ असे नवीन चित्रपट कलाकार अजूनही डॉ. कासिम इमाम यांच्याकडे उर्दू शिकण्यासाठी जातात. 

चित्रपट सृष्टी व्यतिरिक्त, डॉ. कासिम इमाम राजकीय क्षेत्रातही खूप लोकप्रिय आहेत. डॉ साहेबांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदेजी, अजित पवार, शरद पवार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेतील नेते मंडळी यांच्याशी चांगले संबंध आहेत.

 

----- Advertisements -----

 

 डॉ. कासिम इमाम हे महाराष्ट्र सरकारच्या उर्दू साहित्य अकादमीचे वीस वर्षां पासून पदसिद्ध सदस्य आहेत. १ ते १५ ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित मुशायराचे अध्यक्ष डॉ. कासिम इमाम आहेत दिवंगत डॉ. सय्यद नुसरत यांनी मंटोवर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते म्हणाले की, जर उर्दू भाषा फक्त मुस्लिमांची असती तर ? मुन्शी प्रेमचंद, गुलजार, त्रिलोकचंद मेहरम, गुलजार दहेलवी, राजेंद्र सिंह बेदी, जगन्नाथ आझाद, गोपीचंद नारंग इत्यादी प्रसिद्ध कादंबरीकार, साहित्यिक झाले नसते. उर्दू भाषा ही मुस्लिमांची नाही, तर ती सर्व भारतीयांच्या प्रेमाची भाषा आहे. मराठी आणि हिंदी भाषा उर्दू इतक्याच आपणास प्रिय आहेत. डॉ. कासिम इमाम यांनी १२ पुस्तके लिहिली आहेत.  

आकाशवाणीच्या बझमे उर्दू कार्यक्रमाचे ६ वर्षे सूत्रसंचालन त्यांनीच केले आहे. देशभरातील राष्ट्रीय एकात्मते वरील अनेक मुशायरे आणि कवी संमेलना मध्ये डॉ. कासिम इमाम विशेष करून उपस्थित असतातच. हिंदी बद्दल ते म्हणतात, " हिंदी सर्वात सोपी भाषा आहे, सर्वात गोड भाषा आहे. जी नैना बावरे बोलतात, जी सैया सावरे समजतात. डॉ  कासिम ईमाम यांची तुलना भारतातील महान शायर राहत इंदोरी, वसीम बरेलवी, मजरू सुलतानपुरी इत्यादींशी केली जाते. आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त जगभरातील चाहते त्यांचे अभिनंदन करीत आहेत. शायरीच्या क्षेत्रातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व असलेले डॉ. कासिम ईमाम यांच्या जीवनातील हा सोनेरी क्षणच होय., रसिकांनी दिलेला उत्साह आणि प्रतिसाद यामुळे माझा आत्मविश्वास वाढत असल्याचे ते स्वतः सांगतात. शायरी हा माझ्यासाठी दररोज एक खास उत्सव असतो.

----- Advertisements -----

 

आयुष्यातील विविध टप्प्यांवर प्रकाश टाकण्याची त्यांची इच्छा आहे. सामाजिक विषयाला न्याय देणारी शब्दशैली, विनोदी भाषेचा असलेला बाज हा वाचकाला मनोरंजक बनवते आणि श्रोत्यांवरही वर्चस्व गाजवते. जीवन प्रवासात त्यांनी शायरीला एक नवीन चेहरा दिला आहे. नवता हा त्यांचा उर्जेचे स्रोत आहे. ते म्हणतात तुम्हाला शायरी शिकायची असेल, तर तुम्ही खूप आनंदी रहा! प्रेम, वेदना, जीवनातील असंख्य अनुभवांचा सखोल शोध शायर घेत असतो. कारण त्यांच्या शायरीतील भावना, उत्कृष्टता प्रतिबिंबित करते.

    "शायरों के शायर" असेच त्यांंना म्हणता येईल. प्रसिद्ध शायर तेच. मिर्झा गालिब हसरत मोहानी, जिगर मुरादाबादी, या शायराच्या शायरीने उर्दू साहित्य समृद्ध केले आहे आणि त्यांच्या कृती वाचक श्रोत्यांना कायम प्रेरणा देत राहतील. डॉ .कासिम ईमाम यांच्या शायरीने उर्दू साहित्य समृद्ध तर केले आहे त्यांची शायरी आजही भविष्यात वाचकांना आणि श्रोत्यांना प्रेरणा देत आहेत. आज त्यांच्या वाढदिवस खूप शुभेच्छा । योगा योग आज  त्यांच्या शायरी निर्मितीला 50 वर्षे पूर्ण होत आहे. या वर्षीचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या शायरीचा सुवर्ण महोत्सव होय. हे स्वर्णिम क्षण त्यांच्या शायरीला अजून उजाळा देत राहतील. 

----- Advertisements -----

 *डॉ साहब ! हम आपकी साल गिराह पर आपको मुबारक बाद देते हैं ! *हैं खुशबू जिसमे ऊल्फत की, हैं बुं जिसमे मोहब्बत की, बुंधा कर ऐसे फुलों का हार देते हैं ।हमारे पास क्या, जो करे अर्पण, आप जियों हजारो साल ऐसी दूआ देते हैं, ऐसी दूआ देते हैं* । त्यांच्या शायरीसह डॉ कासिम यांना वाढदिवसाच्या मन: पूर्वक हार्दिक सदिच्छा !!!

शेख ईद्रिस  ( संगमनेर )                           पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू सेंटरचे अध्यक्ष.          9890524092

कठीण काळातही आत्मविश्वास ठेवा.

महात्मा गांधी
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin