पत्रकारिता क्षेत्रातही आता पेव फुटल्याने पत्रकाराची खरी व्याख्याच क्लिअर होत नाही. परंतु आपण एखाद्या समूहाशी संघटनेशी जोडले गेल्याने पत्रकाराच्या अस्तित्वाची जाणीव होते. व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या विश्वासार्हतेस बळकटी येत असल्याचे सांगत, हल्ली पत्रकारांबद्दल फारसे चांगले बोलले जात नसल्याची खंत व्यक्त करत या क्षेत्रात बोकाळत चाललेली अपप्रवृत्ती ही पत्रकारिते बरोबर समाजासाठी घातक असल्याचे प्रतिपादन आमादार अमोल खताळ यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मलिक या ठिकाणी पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी खताळ बोलत होते.

यावेळी मंचावर परमपूज्य परमानंद महाराज आशिष आनंद महाराज आमदार अमोल खताळ, संजीवनी उद्योग समूहाचे बिपिन खोले, आदी मान्यवर उपस्थित होते.
येणाऱ्या काळात ख -या पत्रकारांसाठी हे एक आव्हान आहे. पत्रकारांनी डिजिटल माध्यमातून शाश्वत विषयांच्या बातम्या हाच विषय बनवून नावलौकिक संपादन करावा असे आवाहन आमदार खताळ यांनी केले. ते म्हणाले की, याच विश्वासार्हतेवर पत्रकारांना पुढे जावे लागणार आहे. खताळ म्हणाले की, आपण पत्रकाराचे आयुष्य फार जवळून बघितले असल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. माझ्या मतदार संघातील पत्रकारांच्या सुख दुःखात मी नेहमीच एकरूप असतो. पत्रकार भावनासाठी १० लाख रुपये मंजूर केल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. पत्रकार हा आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. कुटुंबातील एक सदस्य या भूमिकेतून पत्रकाराकडे आपण सर्वांनीच बघितले पाहिजे असे ही खताळ म्हणाले, व्हॉइस ऑफ मीडियाची प्रशंसा करीत कार्यशाळेला त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

यावेळी अतिथी मान्यगणांच्या हस्ते व्हाईस ऑफ मीडियाच्या मुखपत्राचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे सह महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेले पदाधिकारी आणि संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक रश्मी मारवाडी तर सूत्र संचालन गोरक्षनाथ मदने यांनी केले.
कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.
स्वामी विवेकानंद