शिर्डी { प्रतिनिधी }
आपले कार्यक्षेत्र अंत:करणाच्या अवस्थांवर परिणाम आणि संस्कार करत असतात. ज्या क्षेत्रातील आपण क्षेत्रज्ञ आहात ते क्षेत्र पत्रकारितेचे आहे. अखिल विश्वामध्ये कार्यरत असणाऱ्या बाबी ह्या एका अटळ नियमाचे कार्यक्षेत्र बनतात. त्यांना अंत माहीत नाही, कधी काय घडेल ? सांगताही येत नाही. पत्रकारिता ही आपले सत्त्व असणारे माध्यम आहे. किंबहुना कायमच परिवर्तन घडवणारा विषय आहे तो. जसे आपण ध्यान केल्याने बदलत जातो. तसे माणसाने बातमी पाहिली, ऐकली अथवा वाचली तरी ती स्वतःपासून बदलत जातात. हे बदल करण्याचे सामर्थ्य केवळ पत्रकारात आहे.

पत्रकारा सारखा प्रभावी योध्दा या जगात दुसरा कोणीच नाही असे मौलिक आणि आध्यात्मिक विचार परम पूज्य श्री परमानंद महाराज यांनी व्यक्त केले. व्हॉइस ऑफ मीडिया आयोजीत पत्रकार कार्यशाळेचे परमानंद महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

जगातील ५२ देशात कार्यरत आणि भारतातील क्रमांक १ ची पत्रकार संघटना असलेल्या व्हाईस ऑफ मीडिया आणि व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने व्हाइस ऑफ मीडिया महाराष्ट्र महिला विंगच्या वतीने सदर केडर कॅम्प आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण नगर मनमाड रोड कोपरगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

प्रमुख उपस्थिती मध्ये आमदार अमोल खताळ, संजीवनी उद्योग समूहाचे, अध्यक्ष बिपीन कोल्हे ,नंदकुमार सूर्यवंशी अध्यक्ष जंगली महाराज, आशीष महाराज व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प. पू. गुरुदेव माऊलींच्या पवित्र भूमीतील चैतन्यपुरी मध्ये जो जीवनाचा भावार्थ कथन केला त्यामुळे जीवन परिवर्तनीय ठरेल. सजीव तत्त्वाप्रमाणे निर्जीव तत्व देखील चैतन्यरूपी अंश आहेत. पत्रकारितेच्या कालखंड आणि बदलते स्वरूपा बाबत सांगत असताना पत्रकारितेचे जनक जांभेकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, आचार्य अत्रे असो तत्कालीन निर्माण झालेली पत्रकारिता आणि आजची सुविधाजनक असलेली पत्रकारिता हा सगळा प्रवास अवलोकित केला. तर निश्चित रूपाने आपल्याला अनुभवायला येईल की शब्द हे शास्त्र आहे तसेच शस्त्र देखील आहे. या शब्दाचा सुनीतीने उपयोग केला तर आपल्या व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक , राजकीय जीवनामध्ये फार मोठे परिवर्तन घडून आणू शकतो. कारण वैश्विक उभारणीसाठीच पत्रकारिता जन्माला आली आहे. भलेही आज त्याची परिभाषा बदलली असेल. परंतु हीच पत्रकारिता पूर्वी खिळ्याची नंतर छपाई करून लिखित स्वरूपात बातमी जिल्ह्याच्या ठिकाणी जात होती. बॉक्साईट प्रिंटिंग वर आली, त्याची पाने रंगीत होऊ लागली. कालांतराने राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय अशा पुरवण्या निघू लागल्या. नंतर हीच पत्रकारिता आकाशवाणीच्या माध्यमातून बोलकी झाली. कालांतराने दूरदर्शनच्या माध्यमातून चलचित्राची पत्रकारिता पुढे आली. आज आपण पाहतो तंत्रज्ञानाने जेवढे दिले त्या तुलनेत पत्रकारितेचा दर्जा उंच स्तरावरती घेऊन जाणारी ही पत्रकारिता वर्तमान काळाची गरज बनली आहे. आणि या आपल्या पत्रकारिता क्षेत्रात ती अनिवार्यता कायम ठेवण्यासाठी अशा सृजनशील कार्यशाळेचे आयोजन हे नितांत गरजेचे आहे. आत्मा मालिक या चैतन्यरूपी संतांच्या भूमीत हा केडर कॅम्प संपन्न होतोय हे प्रशंसनीय आहे.

ज्या भूमीमध्ये आपण वास करीत आहोत. त्या ठिकाणी जीवन परिवर्तन करण्याचे सत्कार्य स्वतः सद्गुरु माऊली करत आहे. त्या माध्यमातून मानवी जीवन सुखकर आणि समृद्ध कसे होईल याचा प्रयत्न समाजातील प्रत्येक घटका बद्दल आपण केला पाहिजे. आज स्पर्धेच्या युगामध्ये पत्रकारिता सांभाळत इतरांच्या अगोदर आपली बातमी कशा पद्धतीने आपल्या वर्तमानपत्रात, चॅनल वर आपल्या पेजवरती कमी वेळेत महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न पत्रकार अति वेगाने आणि प्रभावीपणे समाजा पर्यंत पोहोचविण्यासाठी एक आगळे वेगळे काम करतो. परंतु तुमच्या सगळ्यांच्या मानसिकतेवरचा ताण व्यक्तिगत, तुमचे कौटुंबिक, सामाजिक आणि तुम्ही धारण केलेल्या परिवेशनाचे खऱ्या अर्थानं सार्थक होत नाही. आणि खऱ्या अर्थाने न्याय दिला जाऊ शकत नाही. जीवनातील अनेक पैलूंचा, प्रतिपाद्याचा आशय देत परमानंद महाराज त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
वास्तविक पत्रकारिता हे सतीचे वाण आहे. त्याला योग्य रीतीने आपल्या जीवनामध्ये अंगीकारले आणि हाताळले तर राष्ट्रनिर्माणाच्या तसेच भारत देशाच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये अखिल विश्वामध्ये महासत्ता स्थापनेसाठी सगळ्यात मोठे योगदान आणि सगळ्यात प्रभावी योद्धा तुमच्या शिवाय या जगामध्ये कोणी होऊ शकत नाही. प्रत्येकाचे व्यक्तिगत आत्मचिंतन, घटना, जाणून घेणे गरजेचे आहे. या भूमीमध्ये गेली 39 वर्ष गुरुदेव माऊलीं माणूस घडविणारे संस्कार देत आहे. प्रत्येक पत्रकारांनी 24 तासा पैकी दहा ते पंधरा मिनिटांचा अवकाश स्वतःसाठी आरक्षित केला तर तुमच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन होईल. जीवनातल्या जिवंतपणाला टिकवण्यासाठी तुमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये एनर्जीटीक एक शक्ती आहे. त्या युनिव्हर्सल पावरसाठी थोडा वेळ द्यायला आपणच प्रारंभ केला पाहिजे. याच प्रक्रियेला आध्यात्मा मध्ये ध्यान असं म्हटले जाते. मेडिटेशनने आपण जगावर प्रेम करायला शिकतो. मित्रांनो आपल्या क्षेत्रावर प्रेम करायला जातो पण या सगळ्या धावपळीमध्ये धड पडे पर्यंत आपली धडपड चालू असते. परंतु स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही. आपण आज पासून दररोज 15 मिनिटांचा वेळ स्वतःसाठी स्वतःच्या आत्म्यासाठी आरक्षित करायला सुरुवात करा.

माणसाने कुठेतरी थांबले पाहिजे. तरच त्याला यशाच्या शिखरावर पोहोचता येईल. आपल्या व्यक्तिगत कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात स्थिरत्व यायला सुरूवात व्हायला हवी. आपण दिवसभर केलेल्या कर्मांचे सत्कर्म अथवा चुकून घडलेले दुष्कर्म एक संवेदना जन्माला घालते. या संवेदना आपल्याला व्यक्तिगत जीवनामध्ये स्वतःसाठी हिताच्या असणार आहेत ज्या परिवर्तन घडवून आणल्या शिवाय राहणार नाही. मग क्षेत्र कुठलेही असो जगामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रगती केलेली यांनी विकास साधलेला आहे अशा जीवनचरित्राचे निश्चित अवलोकन करा. प्रत्येकाने प्रत्येक दिवशी स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे तो केवळ आणि केवळ स्वतःच्या निकट येण्यासाठी जवळ बसण्यासाठी . "मी कोण" आहे ? दिवसातून एकदा तरी ते जाणून घेण्याचा अभ्यास केला पाहिजे त्यालाच ध्यान असे म्हटले जाते. यासाठी प्रत्येकाने प्रत्येक दिवशी स्वतःसाठीच वेळ काढला पाहिजे.
चैतन्यमयी अंतरिक शक्तीला जागृत करून तेजोमय तत्वाला अंगिकारा. आपल्या पत्रकारितेमध्ये उतरण्याची शक्ती आपल्यामध्ये विराजीत आहे. आपल्या हातात आलेले जे क्षेत्र आहे तेच फार मोठे शस्त्र आणि शास्त्र म्हणजे शब्दच आहेत. तुमची भूमिका ही तुमच्या लेखणीतून उमटलीच पाहिजे. जांभेकर यांच्या लेखणीचे अवलोकन केले अथवा शब्दप्रणालीने ते अखंड तेवत ठेवले तर आज त्याचाच प्रकाश आपल्याला मिळत राहील, दीपा प्रमाणे प्रज्ज्वलित राहील. म्हणून आपण अंध:कारात इतरत्र देखील प्रकाशित होत असताना आपले जीवन अनुनय करीत आहोत आणि ती प्रज्वलता आज तुमच्या स्वाधीन नाही तुमच्या हातात आहे तुमची भूमिका हे तुमच्या लेखणीतून आंतरिक तत्वाला आपल्या पत्रकारितेमध्ये उतरण्याची ताकद आणि पत्रकारितेवर उद्याचं राष्ट्र घडणार आहे. यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा पत्रकारांचा राहील असे ते म्हणाले.
संपत्तीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे.
शिवाजी महाराज