ब्रेकिंग न्यूज :
भारत

गोगलगावात घडली मन हेलावणारी घटना;

Blog Image
एकूण दृश्ये: 49

गोगलगावात घडली मन हेलावणारी घटना; दोन चिमुकल्या बहिण भावाचा शेततळ्यात पडून करूण अंत ; राहाता तालुका हादरला ;सर्वत्र शोककळा

     राहाता : ( प्रतिनिधी )

तालुक्यातील गोगलगाव शिवारात रविवार दि २ सायंकाळी घडलेल्या प्रकारामुळे अंगावर शहारे आणणा-एका भयावह घटनेने संपूर्ण परिसर स्तब्ध झाला आहे. 

      राहता तालुक्यातील गोगलगाव परिसरातील चौधरी वस्तीजवळील शेततळ्यात पडून दिव्या पोपट चौधरी (वय १०) इयत्ता चौथी आणि शुभम पोपट चौधरी (वय ९) इयत्ता तिसरी या निरागस चिमुकल्यांचा दुर्दैवाने करूण अंत झाला. घरासमोर खेळणारी ही दोन लहान बालके काही क्षणात काळाच्या पडद्याआड गेली. सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेने चौधरी कुटुंबावर आकाशच कोसळले.

अपल्या पोटच्या गोळ्यांना गमावलेल्या आई जयश्री आणि वडील पोपट चौधरी यांचा आक्रोश पाहवत नव्हता. दिव्या , शुभम अशी हाक मारत त्यांचा आर्त विलाप ऐकून गावातील प्रत्येकाचे डोळे पाणावले. सोमवारी दोन्ही चिमुकल्यांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गोगलगावच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशी या दुःखद प्रसंगाने शोक सागरात बुडाली आहे. जीवनाच्या उमलत्या वयात या चिमुकल्यांना अकाली गेल्याने सर्वत्र शोक व हळहळ व्यक्त होत आहे.

----- Advertisements -----

 

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin