ब्रेकिंग न्यूज :
भारत

चार दशकांनी कोपरगावात गहिवरले डेक्स बेंंच;

Blog Image
एकूण दृश्ये: 243

चार दशकांनी कोपरगावात गहिवरले डेक्स बेंंच; १९८४-८५ आढाव विद्यालयाचे माजी विद्यार्थी भेटले एकमेकास; गेट टू गेदर संपन्न; सर्वच झाले भावूक दिला आठवणीना उजाळा 

    कोपरगाव { भारत रेघाटे }

कुणास ठावूक आपण परत ऐकमेकास भेटू अथवा नाही. कारण आपले जीवन, मार्ग नि वाटा वेगवेगळ्या होत्या. तब्बल ४० वर्षात स्वतःच्या आयुष्यातील सुख, दुःख, सोसले, भोगले, साहिले. आणि एक ऊर्मी जागृत झाली. जाणीव झाली त्या मैत्रीची. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही सर्व मित्र मैत्रिणी एकत्र आली. आणि सुरू झाला जुन्या आठवणीचा प्रवास आणि सहवास. ती सर्व एकत्र येताच सर्वांना गहिवरून आले.

प्रांगणातल्या बहरलेल्या गुलमोहराच्या नाजूक अशा फुलानी स्वागतासाठी जणू सडा शिंपडला होता. शाळेत पाटीवर श्रीगणेशा शिकलो तो कार्यारंभ करण्यासाठी. गेट-टुगेदर कार्यक्रमाचा कार्यारंभ करण्यापूर्वी आता याच विद्यार्थ्याने श्री गणेशा करत कार्यक्रमाला सुरुवात केली. या मित्रांनी श्री गणेशाच पूजन केले. वर्ग बघून त्या डेक्स बेंचवर पुन्हा नव्याने एकत्र येत मनसोक्त गप्पा टप्पा झाल्या. याच डेक्स बेंचवर केलेला तो दहावीचा अभ्यास, सहवास, असा तब्बल ४० वर्षानंतर प्रवास जशाचा तसा स्मरला. माजी विद्यार्थी, मित्र, मैत्रिणी, एकमेकास भेटल्या.. गळाभेट घेत गहिवरले. 

 प्रसंग आहे कोपरगाव येथील नगरपालिकेच्या माधवराव कचेश्वर आढाव माध्यमाक व तांत्रिक विद्यालयातील. सर्व माजी विद्यार्थी ४० वर्षांनी एकत्र आलीत. या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शिर्डी समृद्धी मार्गा जवळील हॉटेल स्वस्तिक सांस्कृतिक हॉल मध्ये धमाल करत, मैत्रीचा, आणि स्नेह भोजनाचा स्वाद घेत सोहळा पार पडला. आठवणी सांगताना गहिवरले. काहींची परिस्थिती मध्यम तर काही गरीबी हलाखीच्या परिस्थितीत शिकले. ढिगळं लावलेली हाफ चड्डी आणि वडिलांच्या पायजम्याची केलेली पिशवी हेच त्यांचे दप्तर होते, भविष्य होते. या शाळेत जीवन शिवण्याचे धडे या विद्यार्थ्यांनी घतले ते भविष्याचा वेध घेण्यासाठी . कोणी शिक्षक, कोणी उद्योजक, कोणी डॉक्टर ,कोणी बेकरी व्यवसाय, कोणी सरकारी नोकरदार तर कोणी नगरपालिकेत तर कोणी रेल्वे खात्यात ,कोणी कंपनीचा सीईओ झाला कोणी शेतकरी तर कोणी राजकारणी बनला. यावेळी शालेय जीवनासह ४० वर्षातील घडलेल्या आठवणींना सर्वांनी उजाळा दिला, काहींनी आनंदाश्रुना वाट मोकळी करून दिली. तर काहींनी घडलो, बिघडलो याचा अनुभवही कथन केला इयत्ता आठवी आणि नववी अशा दोन बॅच होत्या. परंतु आम्ही दहावीला सर्व एकत्रित आलो. आमची एकच बॅच झाली. तब्बल ६१ विद्यार्थ्यां पैकी १५ मित्र आम्हाला सोडून गेले . त्यांचे स्मरण आम्हाला आवर्जून होत असते. त्यांच्या प्रती श्रध्दांजली वाहण्यात आली. बाकीच्या अनेक मित्र-मैत्रिणींचे अधून मधून भेटी गाठी होतच असतात. या कार्यक्रमाला तीस मित्रांनी हजेरी लावली.  तर काही मित्र आजजही श्रमिक आहेत. म्हणूनच अशा श्रमदात्यांना जीवनातील एक अनोखा विरंगुळा म्हणून या कार्यक्रमात घेता 

----- Advertisements -----

कोणाचे वय वर्ष ५६ तर कोणाचे साठी जवळ पोहोचलले. ही सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र आलीत. जाणीव झाली त्या जीवनाच्या शाळेची. गेट-टुगेदर मधून अशा मधूर मैत्रीच्या प्रेमाची झालर घालत जणू हा सोहळा त्यांनी द्विगुणित केला. आपले वय, पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेवून साठी कडे झुकलेल्या या विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहाने एकत्र आले. सर्वांच्या चेहऱ्यावर अनेक वर्षा नंतर भेटल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. कारण होते चाळीस वर्षा नंतर आपण भेटल्याचे. बालपणीचे सर्व वर्ग मित्र पुन्हा एकत्र आले. गळाभेट घेत गहिवरले, ऋणानुबंधाची भाषा यापेक्षा वेगळी काय असू शकते ? राजेंद्र अडांगळे, गोरख पंडोरे, मंगला भागवत, संजीवनी सोनार, रेणुका जोशी, चंद्रकांत पाले, यांनी आपले मनोगत व्यक्त केले, अध्यक्षीय मनोगत शकील कुरेशी यांनी व्यक्त केले. सदर प्रसंगी अरुण शिरसाठ, मनोज दरपेल,प्रकाश शर्मा, चंद्रकला आवारे, अंबादास जाधव, दिलीप जोर्वेकर, किरण मवाळ, राजेंद्र सोनवणे, प्रदीप इर्षे हे सर्व मित्र मैत्रिणी उपस्थित होते..

महेंद्र टोरपे यांच्या सूत्रसंचलाने रंगत वाढवली. तर प्रास्ताविकात नारायण तांबट यांनी जीवनातील जाणीव आणि मैत्रीची उणीव काय असते. हे सांगत असताना सर्वजण स्तब्ध झाले. आणि ४० वर्षांपूर्वीच्या मागच्या इतिहासात गेले. जणू शाळेच्या खिडक्या, दारे, भित्ती आणि पटांगण आजही नजरेसमोरून हटत नाही. कारण ह्या जुन्या आठवणी नेत्र पटलावर कायमची सोबत करून राहणार. अगदी आपल्या मैत्री सारखी. विजय चव्हाणच्या काव्यगीताने विजयी दाद मिळवली. मनोज लोट, बाळासाहेब चव्हाण यांनी सर्वांना गुलाबपुष्प देत स्वागत केले. महेंद्र टोरपे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

----- Advertisements -----

स्वत:ची किंमत ओळखली, तर जग जिंकल्यासारखे आहे.

संत एकनाथ