ब्रेकिंग न्यूज :
भारत

चिमुकल्यासह पाच मृतदेह आढळल्याने जिल्हा हादरला ;

Blog Image
एकूण दृश्ये: 790

चिमुकल्यासह पाच मृतदेह आढळल्याने जिल्हा हादरला; श्रीगोंद्यातील चिमुकल्यांची को-हाळ्यात हत्या ; वडिलांनीही संपवले जीवन ; चार मुलासह वडिलांचा मृतदेह आढळला विहिरीत ; कौटुंबिक वादाने पाच जणांचा गेला बळी

      राहाता : भारत रेघाटे

एकीकडे स्वातंत्र्य दिन आणि दहिहंडीचा उत्सव साजरा होत असताना, श्रीगोंद्यातील एका कुटुंबाने राहाता तालुक्यातील को-हाळे या ग्रामीण भागात असलेल्या एका विहीरीत चार चिमुकल्यासह वडिलांचा असे तब्बल पाच मृतदेह आढळल्याची एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटनेने संपूर्ण अहिल्यानगर जिल्हाच हादरून गेला आहे. विहिरीत एवढे मुतदेह आढळणे ही जिल्ह्यातील बहुदा पहिलीच घटना असावी.

        श्रीगोंदा येथील एका व्यक्तीसह त्यांच्या कुटुंबातील तीन मुले, एक मुलगी आणि वडिलांचा मृतदेह कोऱ्हाळे ता. राहाता शिवारातील एका विहिरीत आढळून आले. सदरची घटना कोराळे गावापासून दूर असलेल्या एका शेतात घडल्याने घडलेल्या प्रकाराबाबत परिसरात आणि कोराळे गावात ग्रामस्थांना क पुसटशी कल्पना देखील आली नाही.

----- Advertisements -----

    सदर मृतदेहाची ओळख पटली असून वडील अरूण काळे श्रीगोंदा वय वर्ष 35 मुलगी शिवानी वय ८ कबीर, प्रेम, वीर, हे चारही लहान बालके विहिरीत ढकलून दिल्याने या दुर्घटनेमध्ये पाच जणांचा बळी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे .

       श्रीगोंदा येथील अरुण काळे 35 आणि त्यांची पत्नी यांच्यामध्ये सातत्याने वाद होत असत. दोघा पती- पत्नीचे वाद अत्यंत शिगेला पोहोचले. पत्नी रागाने माहेरी येवला येथे निघून गेल्याने श्रीगोंदा येथील रहिवासी असलेले अरुण काळे यांनी आपल्या बायकोला माघारी फिरून ये ! अन्यथा मुलासह मी माझे जीवनच संपवतो असा दम भरला. अखेर पत्नी ऐकत नसल्याचे लक्षात येताच मुलांना घेवून थेट येवला येथे जात असताना को-हाळे येथील विहिरीत या मुलांना बांधून ढकलून दिले. व स्वतःच्याही हातापायाला बांधून जीवन यात्रा संपवली. घटनेचे गांभीर्य समजताच शिर्डी पोलीस उपाधिक्षक शिरीष वमणे, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, राहात्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतून पाचही मृतदेह बाहेर काढले.

        शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने म्हणाले की सदरची घटना कौटुंबिक वादातून झाली असून या घटनेमध्ये विहिरीतून पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामध्ये वडील अरुण 35 आठ वर्षाची मुलगी शिवानी ही मोठी असून बाकीचे तिन्ही मुले वय वर्ष पाच, सहा, सात अशा वयोगटातील आहेत. श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले की नमूद घटनेतील पाचही मृतदेह मिळून आले असून, राहता पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया करीत आहे

 

 

----- Advertisements -----

 

 

सुखाचे रहस्य समाधानात आहे.

संत ज्ञानेश्वर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin