ब्रेकिंग न्यूज :
भारत

पत्रकार कार्यशाळेचे आयोजन ;

Blog Image
एकूण दृश्ये: 80

पत्रकार कार्यशाळेचे आयोजन ; व्हाइस ऑफ मीडिया महाराष्ट्र महिला विंगचा पुढाकार आरोग्य तपासणी होणार 

      शिर्डी { प्रतिनिधी }

जगातील ५२ देशात कार्यरत आणि भारतातील क्रमांक १ ची पत्रकार संघटना असलेल्या व्हाईस ऑफ मीडिया आणि व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने व्हाइस ऑफ मीडिया महाराष्ट्र महिला विंगच्या वतीने पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

       आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण नगर मनमाड रोड कोपरगाव या ठिकाणी पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

        या कार्यशाळेचे उद्घाटन शनिवार दि. ३१ मे रोजी सकाळी ९ वा. पू. पू. परमानंद महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर प्रमुख उपस्थिती मध्ये खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अमोल खताळ, आमदार स्नेहलता कोल्हे , बिपिन दादा कोल्हे अध्यक्ष संजीवनी उद्योग समूह, नंदकुमार सूर्यवंशी अध्यक्ष जंगली महाराज, मालपाणी उद्योग समूहाचे गिरीश मालपाणी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

       दोन दिवस चालणाऱ्या या चर्चा सत्रामध्ये शनिवार दि. ३१ मे रोजी पहिल्या सत्रात व्याख्याते सुनील माळी संपादक दैनिक पुढारी पुणे यांचे वृत्त लेखन तर दुपारी १२ वा. पत्रकारितेचे बदलते स्वरूप या विषयावर घनश्याम पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. 

----- Advertisements -----

       द्वितीय सत्रात ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार संदीप वाकचौरे हे ग्रामीण पत्रकारिता यावर मार्गदर्शन करतील. दुपारी ४ वाजता सहकार अभ्यासक मधुकरराव नवले हे पत्रकारितेतील समाजाच्या अपेक्षा यावर संवाद साधणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मार्गदर्शक संदीप काळे संघटनात्मक बांधणी, कौशल्य आणि आढावा या चर्चे नंतर अतिथीशी संवाद साधणार आहेत.

       रविवार दिनांक १ जून रोजी प्रथम सत्रात आंतरराष्ट्रीय व्ही ओ एम चे प्रमुख गगन महोत्रा व्यावसायिक मानसिकता यावर मार्गदर्शन करणार आहेत. सकाळच्या सत्रामध्ये व्याख्याते प्रा. अरुण लेले हे मराठी पत्रकारितेचे शुद्धलेखन तर दुसऱ्या सत्रामध्ये ज्येष्ठ पत्रकार स्मिता गुणे पत्रकारितेतील बदलते स्वरूप यावर व्याख्यान होणार असून सायंकाळी संस्थापक अध्य‌क्ष मार्गदर्शक संदीप काळे हे कार्यक्रमाचा आढावा घेत अतिथींशी संवाद साधणार आहेत.

         कार्यक्रमाच्या दरम्यान मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. सायंकाळी साडेपाच वाजता श्री साईबाबाच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

कठीण काळातही आत्मविश्वास ठेवा.

महात्मा गांधी
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin