पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, संगमनेरचे होते रहिवाशी, पुणे खडकीत होते कार्यरत, लोणावळ्यात झाडाला गळफास घेत संपवली जीवनयात्रा
संगमनेर
तालुक्यातील रहिवासी असलेल्या आणि पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात टायगर पॉईंट येथे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धकादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे खडकी येथे पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक असलेले अण्णा ऊर्फ अनिल गुंजाळ हे संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील रहिवासी आहेत.
घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून खडकी पोलिसांचे पथकही लोणावळा तपासासाठी आले होते. पोलिसांनी गुंजाळ यांचा मृतदेह ताब्यात घेत गुंजाळ यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण शोधले जात आहे.
आत्महत्या पूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे का याचा देखील तपास केला जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते कर्तव्यावर नव्हते. संपर्क करूनही होत नसल्याची माहिती समोर येत होती त्यामुळे कुटुंबियांकडूनही त्यांचा शोध सुरू होता. अखेर त्यांचा तपास लागला असता त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले पत्नी आई वडील आहेत. खांडगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.