**विद्यार्थी बनले आर जे रेडिओ दिना निमित्ताने होणार सन्मान ; नगर रेडिओ ९०.४ एफ.एम वर आर जे कॉनटेस्ट स्पर्धा संपन्न**
अहिल्यानगर { प्रतिनिधी }
विद्यार्थ्यासह इतर सर्व सामान्य व्यक्तींना आवाजाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नगर रेडिओ ९०.४ तर्फे आरजे कॉनटेस्ट स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातून १०० स्पर्धकांनी या मध्ये सहभाग नोंदविला. जागतिक रेडिओ दिना निमित्ताने १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रेडिओ नगर प्रतिसाद केंद्र, लेंडकर मळा, बालिका आश्रम रोड येथे सदर बक्षीस वितरण होणार आहे. अशी माहिती नगर रेडिओ केंद्र प्रमुख संदीप क्षीरसागर यांनी दिली. स्पर्धेप्रसंगी स्नेहालय रेडिओ नगर परिवारा तर्फे आर जे रेडिओ निवेदक कॉनटेस्ट मध्ये सहभागी सर्व विजेत्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थी गटातून आरजे कॉनटेस्ट स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उतेजानार्थ अशी गटवारी करण्यात आली. प्रथम क्रमांक विभागून चेतन बंडू औटे, रणजीत केकन तर द्वितीय क्रमांक विभागून तनया ठाकूर, सिओन कोल्हे तृतीय क्रमांक विभागून अर्णव श्रीनिवास भोंग, रक्षिता लिमये तर उतेजनार्थ कौसर असीफ शेख आणि शक्ती दीपक गायकवाड . खुला गटातून आरजे कॉनटेस्ट स्पर्धेत प्रथम, द्वितीय,तृतीय उतेजानार्थ मिळालेले स्पर्धक प्रथम क्रमांक दिनेश अशोक धीवर, द्वितीय क्रमांक विभागून डॉ मकरद धर्मा आणि पूनम लक्ष्मण खोदाडे तर तृतीय क्रमांक विभागून कल्याण पवार आणि कविता अमोल रच्चा उतेजनार्थ म्हणून यास्मीन सय्यद आणि बाळासाहेब घोरपडे यांना देऊन गौरव करण्यात येणार आहे.