एकूण दृश्ये: 25
जिल्ह्यात पत्रकाराचे मजबूत संघटन करून प्राधान्याने पत्रकारांच्या समस्या सोडविणार :- जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने
{ राहुरीत व्हाईस ऑफ मीडियाची आढावा बैठक संपन्न }
राहुरी { प्रतिनिधी }
पत्रकारांचे एखादे संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हा, तालुका आणि गाव स्तरावर सभासद नोंदणीत वाढ होणे अपेक्षित आहे. सततच्या धावपळी आणि स्पर्धेच्या युगात पत्रकारांची शारीरिक, आर्थिक, मानसिक हेळसांड होत असते. एकूणच या क्षेत्रात काम करत असताना तो स्वतःकडे दुर्लक्ष करतो. पर्यायाने अनेक समस्याला तोंड देण्याची वेळ पत्रकारांवर येते. अशावेळी एखादे मजबूत संघटनच पत्रकारांसाठी कामी येत असते. आंतरराष्ट्रीय संघटना असलेले व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असल्याचे प्रतिपादन व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी केले. संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय संघटक दिल्ली अशोक वानखेडे, प्रदेश कार्याध्यक्ष विजय चोरडीया, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश सरचिटणीस दिगंबर महाले, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र (नाना) दोरकर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथे संघटनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, उपाध्यक्ष बाळासाहेब गडाख, सचिव अमोल मतकर, कोषाध्यक्ष गोरक्ष नेहे, शहराध्यक्ष भारत रेघाटे, संगमनेर तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू, अकोले तालुकाध्यक्ष संदीप दातखिळे, राहुरीचे तालुकाध्यक्ष गोविंद फुणगे,जिल्हा कमिटीचे सदस्य शरद पाचरणे आदि पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये जवळपास दीडशे सक्षम पत्रकारांचे मजबूत संघटन निर्माण करणार असून आत्तापर्यंत 70 टक्के सदस्य नोंदणी झालेली आहे. प्रत्येक तालुक्यात सदस्य नोंदणी आणि तालुका अध्यक्षांची निवड करून संघटनेची बांधणी मजबूत करणार असल्याचे मदने यांनी सांगितले. तसेच पत्रकारांच्या आर्थिक ,आरोग्य, घराच्या आणि मुलांच्या शिक्षणा बाबत वरिष्ठ पातळीवर विचार विनिमय करून प्रश्न सोडवले जाणार आहेत. पत्रकारांना पेन्शन योजना तसेच यशस्वीपणे अधिवेशन करून पत्रकारांचा मानसन्मान आणि कार्य उंचावण्याचे काम संघटना सातत्याने करीत आहे. हाच विश्वास नजरेसमोर ठेवून अ. नगर जिल्हाध्यक्षपदी गोरक्षनाथ मदने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब गडाख म्हणाले की, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड ही लोकशाही पद्धतीने होत असते. अत्यंत अल्पशा कालावधीत मदने यांनी संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांसाठी भरीव योगदान दिले. याच कार्याची दखल घेत त्यांना पुनश्य जिल्हाध्यक्षपदी मदने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जिल्हा सचिव अमोल मतकर यांनी आभार मानले.जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने पत्रकाराच्या समस्या लवकरच सुटतील असा आशावाद व्यक्त केल.