छत्रपती शिवाजी महाराजांसह महामानव, महात्म्यांचे पूजन करून खांडगावात शिवजयंती उत्सव साजरा
संगमनेर ( प्रतिनिधी )
तालुक्यातील खांडगाव येथे समस्त बांधवांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांच्या प्रतिमेचे पूजन खांडगाव येथील ज्येष्ठ नागरिक नारायण अरगडे, कादरभाई शेख, कारखान्याचे संचालक रमेशभाऊ गुंजाळ, डॉ सुरेश , बालोडे, एडवोकेट विकास गुंजाळ , कामगार पोलीस पाटील छाया गुंजाळ, कमल अरगडे, संदीप गुंजाळ यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा खांडगाव येथील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा सादर करून शस्त्राची मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध पोवाडे, वकृत्व स्पर्धा, जिजाऊ शिवजन्मोत्सवाचा पाळणा सादर केला. ग्रामस्थांनी मुलांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. रमेशभाऊ गुंजाळ , अमीर शेख, दत्ता ढगे , राम अरगडे इतर कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच विकास गुंजाळ यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार व्ययक्त केले.
--------------------------------
ॲड. विकास जगताप सर
मो. 9922876008 / 8999503447
------------------------------------
आपणास विनंती आहे की , अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या हक्काच्या -
राजगृह न्युज चॅनलला -
https://rajgriha.in/
युट्युब चॅनेलला -
https://youtube.com/@prof.vikasb.jagtapsir.7282?si=7hRUIOgJNM4lqyLl
फेसबुक पेजला -
https://www.facebook.com/share/18JqJ2BzDU/
व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा -
https://chat.whatsapp.com/HjMw7i3tZZ0K9okXPm9KHi
व्हॉटसॲप चॅनलला -
https://whatsapp.com/channel/0029Vasu8HZIt5s4Z3apXH45
जास्तीत जास्त लोकांनी लोकांपर्यंत
# लाईक करा @
# शेअर करा @
# सबस्क्राईब करा @
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..