ब्रेकिंग न्यूज :
भारत

महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू ; चालक अटक

Blog Image
एकूण दृश्ये: 290

महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू ; चालक अटक

    संगमनेर प्रतिनिधी

शहरातील अकोले रोडवरील ईदगाह मैदानाजवळ ट्रकच्या चाकाखाली एका युवकाचे डोके गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना गुरुवारी दि. ३ जुलै रोजी दुपारी १.३० च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, खांडगाव येथील एक तरुण त्याच्या दुचाकीवरून क्रीडा संकुल रोडवरून अकोले रोडकडे जात होता. यावेळी ट्रक क्रमांक एम एच सी एस 42 ए 9242 अकोलेकडे जात होता. रस्त्याच्या कडेला भाजीपाल्याची दुकाने आहेत. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. दरम्यान, ट्रक आणि दुचाकीस्वाराला एकमेकांच्या वाहनांची कल्पना आली नाही. त्यामुळे दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली सापडला. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मृत तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले तत्पूर्वी या युवकाचे निधन झाले होते. तर ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अपघातानंतर मृत तरुणाच्या डिक्कीत आधार कार्ड सापडले, ज्यावर ओम गणेश गुंजाळ वय ( २०) खांडगाव असे लिहिले आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ओम गुंजाळचा जागीच मृत्यू झाला. ओम गुंजाळ हा विज्ञान शाखेचा पदवीधरचा विद्यार्थी होता. त्याच्या पश्चात त्याचे आईवडील आणि एक विवाहित बहीण आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात हो मोर अंतिम संस्कार करण्यात आले. घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

वळणावर गतिरोधक बसवावेत.  --ज्या ठिकाणी अपघात झाला  त्याच ठिकाणी पूर्वी सात ते आठ अपघात झाले आहेत. शहरातील प्रत्येक रस्त्याच्या वळणांवर विविध ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. शहरात अनेक ठिकाणच्या वळणावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच जुने पोस्ट ऑफिस वळणावर पुण्याकडून भरधाव वेगाने दुचाकी, चार चाकी वाहने येत असतात. भारत चौकाकडे येण्यासाठी वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. या वळणावर गतिरोधक अथवा सिग्नल बसवण्यात यावे. शहरातील अनेक ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

 

----- Advertisements -----

कठीण काळातही आत्मविश्वास ठेवा.

महात्मा गांधी