ब्रेकिंग न्यूज :
भारत

चोरट्याने शेडमधील शेळ्या बोकड केले लंपास ; कधी लागेल तपास शेतकरी धास्तावले

Blog Image
एकूण दृश्ये: 1104

चोरट्याने शेडमधील शेळ्या बोकड केले लंपास ; कधी लागेल तपास शेतकरी धास्तावले 

   संगमनेर ( प्रतिनिधी ) 

तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड वस्ती वस्तीवरील एका शेतकऱ्याचे तब्बल 12 शेळ्या आणि बकरे कोणीतरी अज्ञात चोरट्याने आपल्या पिकप मध्ये घालून लंपास केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड येथे घडल्याने या घटनेने शेळीपालनकर्ते चांगलेच धास्तावलेले आहेत.

   हिवरगाव पावसा देवगड येथील संपत भीमाजी शिंदे 55 हे शेतकरी उदरनिर्वासाठी शेळीपालनाचा व्यवसाय करत असून त्यांच्या शेडमधून दि शनिवार दि 23 पहाटे तीन वाजता शेडचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे किंमत 60 हजार किंमतीचे 12 शेळी बोकड चोरी करून लंपास केले.

संपत शिंदे आपल्या कुटुंबासमवेत रात्रीचे भोजन करून झोपी गेले असता. मध्यरात्री त्यांना शेळ्यांचा आवाज आला. ते बाहेर आल्यावर त्यांना दहा ते पंधरा लोकांचे टोळके शेड मधून शेळ्या बोकडी घेऊन ते पिकप मध्ये भरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी जागीच हटकताच चोरट्यांनी भरधाव वेगाने पिकप पळवली. इतर बाकीचे काही जण मोटर सायकलस्वार पसार झाले. शिंदे एकटेच असल्यामुळे त्यांना आरडाओरड देखील करता आली नाही. त्याचप्रमाणे वस्ती जवळ कोणी नसल्यामुळे याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी मात्र त्यांच्या शेळ्या आणि बोकडावर डल्ला मारला. याबाबत शिंदेने घुलेवाडी पोलीसात तक्रार दाखल केली आहे साधारण पाच ते सहा महिन्याचे व काही दहा ते अकरा महिन्याचे शेळी बोकड होते. त्यांचे या घटनेत लाख रुपयांचे नुकसान झाले. तालुक्यातील चंदनापुरी सावरगाव खांडगाव येथेही अशा घटना घडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

----- Advertisements -----

गोवंश जनावराची कत्तल काही प्रमाणात थंडावली असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा शेळ्या बकऱ्याकडे वळवल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे शेळ्या मेंढ्याच्या चोरीच्या प्रमाणात तालुक्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेळीपालनकर्ते चांगलेच धास्तावल्याचे दिसून येत आहे. अशा चोरांवर तात्काळ अंकुश लावून कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.सदर शेतकऱ्यांने तालुका पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

यशस्वी माणूस तोच, जो प्रत्येक संकटाला संधी म्हणून पाहतो.

अज्ञात
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin