ब्रेकिंग न्यूज :
भारत

अबब ! पकडला दहा फुटाचा अजगर ;

Blog Image
एकूण दृश्ये: 351

अबब ! पकडला दहा फुटाचा अजगर ; जिगरबाज दगडू रुपवते, अमर अरगडे सर्पमित्रांनी सोपवला वनविभागाकडे 

    संगमनेर : भारत रेघाटे

सायंकाळची वेळ घरासमोरील मूर घासच्या बॅगेत हळूवार एक भल्ला मोठा अजगर गेल्याचे शेतकरी सोमनाथ किसन गुंजाळ यांच्या निदर्शनास आले त्यांनी त्यास तसेच झाकून ठेवले तात्काळ गावातील सर्पमित्र दगडू रुपवते, सचिन अरगडे यांना कळविले ही वार्ता सर्पमित्रांना समजताच तात्काळ ज्या ठिकाणी अजगर गेला त्या ठिकाणाकडे धाव घेतली. सर्पमित्र म्हटले म्हणजे साप हा त्यांचा मित्रच जणू. लागलीच अतिशय शिताफिने या दोन सर्पमित्रांनी मुरघासाच्या बॅगमधून भल्ला मोठा दहा फुटाचा अजगर बाहेर काढला. ही घटना तालुक्यातील खांडगाव येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

कदाचित हा अजगर गुंजाळ यांच्या निदर्शनास आला नसता तर रात्री अपरात्री एखादी मोठी दुर्घटनाही घडू शकली असती. आढळून आलेला अजगर हा अजगर तब्बल दहा फूट लांबीचा आणि मांडी पेक्षाही जाडजूड असाच होता. या अजगराला बाहेर काढण्याचे सर्पमित्राचे शर्थीचे प्रयत्न सफल झाले.खांडगाव मध्ये पहिल्यांदा दहा फुटाचा अजगर सापडल्यामुळे अनेकांना तर आश्चर्याचा धक्काच बसला. 

 

----- Advertisements -----

सर्पमित्र दगडू रुपवते यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की, सध्या पावसाचे दिवस सुरू असून सर्प, अजगर, धामण हे वन्यजीव बीळात अथवा पाणी साठलेल्या भागातून बाहेर पडत असतात त्यामुळे आपण काळजी घ्यावी तसेच निदर्शनास आल्यास सर्पमित्रांना संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. 

सर्पमित्र सचिन आरगडे म्हणाले की, वन्यजीव हे निसर्गाचे मित्र तसेच मानवाचे मित्र आहेत. त्यांची काळजी घेत आपण आपली काळजी घेतली पाहिजे. याक्षणी अजगराला पाहण्यासाठी नागरिकांनी मात्र गर्दी केली होती. सदर अजगराला पकडून सर्पमित्रांनी वनविभागाकडे सुपूर्त केले.‌ ज्या घराजवळ आणि परिसरात अजगर आढळून आला तेथील नागरिकांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला.

समजूतदारपणा ही जीवनाची खरी शिकवण आहे.

संत तुकाराम