आमदार खताळांवर हल्ला करणाऱ्या युवकास चार दिवसांची पोलिस कोठडी
संगमनेर : प्रतिनिधी
आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणी खांडगाव येथील प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येवून, रात्री उशिरा अटक करण्यात आली. शुक्रवार दि.29 रोजी न्यायालयात हजर केला असता गुंजाळ यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मालपाणी लॉन्स मध्ये गणेश फेस्टिवल दरम्यान सदरचा प्रकार घटला होता. आमदार खताळ स्टेजवरून खाली येत असताना कार्यकर्त्या सोबत फोटो काढून पुढील कार्यक्रमासाठी निघताना लोकांशी बोलत हस्तांदोलन करत शुभेच्छा त्या गर्दीचा फायदा घेत खांडगाव येथील प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ या युवकाने खताळ यांना
धक्काबुक्की करत डाव्या गालावर चापट मारून पळून जात असताना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले. राजापूर येथील
संदेश बाळासाहेब देशमुख रा .राजापूर यांनी फिर्याद दिली असून भारतीय न्याय संहिता 109 351 (2) प्रमाणे आरोपी प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ याचे विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
वाघचौरे म्हणाले की, आरोपी प्रसाद गुंजाळ यास चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे . आरोपीला कोणी चिथावणी दिली किंवा कसे ?आरोपी कोणाच्या संपर्कात होता? अन्य कोणी साथीदार आहेत किंवा कसे? या सर्व बाबींचा तांत्रिक पुराव्यांवरून तपास करण्यात येत आहे. पोलीस गुन्ह्याचा सर्व बाजूनी तपास करीत आहे.

