समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द ; मंदिराच्या जागेसाठी प्रयत्न करू :- मंत्री बोर्डिकर
जिंतूर (प्रतिनिधी )
विश्वाच्या निर्मितीत विश्वकर्मा समाजाचे योगदान मोलाचे आहे.समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबध्द राहून समाज मंदिराच्या जागेसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या मंत्री मेघना बोर्डिकर यांनी जिंतूर येथे केले. विश्वाचे आराध्य दैवत प्रभू श्री भगवान विश्वकर्मा समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर तसेच परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले .तसेच नगरपालिका मुख्याधिकारी, तसेच माजी नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांना ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर यांनी विश्वकर्मा प्रगट दिनाच्या वेळी होणाऱ्या गैरसोयी बाबत माहिती देण्यात आली. यावेळी कैलास पांचाळ, राम रेघाटे, मनोज राजोतिया, रविकांत पांचाळ अशोक पांआली यावेळी विश्वकर्मा समाज बांधव उपस्थित होता. समाज बांधवांच्या मागणीचा योग्य विचार करून समाज मंदिरासाठी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली.