राजूर प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय व भारत सरकारच्या भूसंसादन विभागाच्या वतीने अकोले तालुक्यातील शिरपुंजे बु येथे राष्ट्रीय पातळीवरील पाणलोट यात्रेचे स्वागत करण्यात आले. ही यात्रा जनजागृती करण्याकरिता आयोजित करण्यात आल्याचे कृषी अधिकारी यांनी सांगितले. या यात्रेतमध्ये वॉटरशेड, ध्वनी चित्रफीद्वारे फिरत्या रथाचे उदघाटन यावेळी करण्यात आले. जल है तो कल है, "जल ही जीवन है" सेव्ह वॉटर शेव्ह लाईफ, अश्या लक्षवेधी घोषणांचे फलक हातात घेऊन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, इगतपुरी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ दीपक डामसे, आमदार डॉ किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पा लहामटे यांच्यासह स्थानिक वॉटरशेड योद्धे, युवक,शेतकरी, महिला, पुरुष, युवक,शालेय विद्यार्थी, शिक्षक,जलसंधारण, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थ ,महिला ,शालेय विद्यार्थी कर्मचारी, यांनी गावात जलदिंडी,काढली होती.या दरम्यान गावातील लाभार्थी मारुती सक्रू धिंदळे यांच्या शेततळ्याचे लोकार्पण व वृक्ष लागवड करण्यात आले. यानंतर शिरपुंजे बु येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मुख्य कार्यक्रम शिव जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, डॉ दीपक डामसे ,डॉ रवींद्र रोकडे ,गावच्या सरपंच कांताबाई धिंदळे, पुष्पा लहामटे, उपसरपंच गुलाब धिंदळे या प्रमुख पाहुण्यांचा उपस्थितीत कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली झाला. यावेळी त्रिंबक धराडे यांचा कलापथकाने पाणलोट, लोकसहभाग, श्रमदान, पाणी बचत, या संदर्भात गाणे व विनोदी संभाषण करत ग्रामस्थ याची पाणलोटा संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य सादर केले. तसेच डॉ दीपक डामसे यांनी खुरासनी पिकाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी कृषी विभागाच्या विवीध योजनांची माहिती देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. पाणलोट यात्रेत डॉ रवींद्र रोकडे यांनी शेती मधे ठिबक सिंचनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामस्थ व मंडळ कृषी अधिकारी राजूर यशवंत खोकले, कृषी सहाय्यक सचिन साबळे, मोहन धिंदळे, कापसे मधे धिंदळे यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित कृषी भूषण गंगाराम धिंदळे, जलसंधारणचे प्रदीप नवले, कृषी पर्यवेक्षक, नारायण घुले, मीनानाथ गभाले, बाळनाथ सोनवणे, कृषि सहाय्यक वन विभाग , ग्रामपंचायत , शिक्षक व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.