दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन मोबाईलचा अतिरिक्त वापर आणि नियमाची पायमल्ली करीत
बेशिस्त वाहतुकीने अपघातात वाढ होत आहे संपूर्ण शहरात आणि एकूणच त्याचा परिणाम परिसरात जाणवतो. बेशिस्त वाहतुकीमुळेच अपघात होतात हे बाब फारच चिंताजनक आहे असल्याचे प्रतिपादन आरटीओचे अधिकारी डी आर पाटील
यांनी केले राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त अगस्ती महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकी बाबत शिस्त आणि नियमाची अंमलबजावणी करण्याबाबत रॅली आणि प्रबोधनातून जनजागृती करण्यात आली. हेल्मेट चा वापर करा, वाहने सावकास चालवा ,गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नका, मद्य प्राशन करू नका तसेच सीटबेल्टचा वापर करणे अत्यावश्यक आहे अल्पवयीन मुलांच्या हातामध्ये वाहने देऊ नका वेग मर्यादेचे पालन करा असे आव्हान डी आर पाटील यांनी केले यावेळी आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले या रॅलीमध्ये तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे आरटीओ विभागाचे सोमनाथ बोंकले आर बी देशमुख तसेच आरटीओ विभागाचे अधिकारी कर्मचारी शहर पोलीस कर्मचारी
अगस्ती महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना आरटीओ अधिकारी मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांचे लक्ष खाली माना खालून
डोके मात्र मोबाईल मध्ये गेल्याची खंत ही व्यक्त केली.