आरोग्य

सुप्रजा निर्माण व्हावी ; डॉ उमा कुलकर्णी ( वीरगावात मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत )

Blog Image
एकूण दृश्ये: 72

सुप्रजा निर्माण व्हावी ; डॉ उमा कुलकर्णी ( वीरगावात मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत ) 

   अकोले (प्रतिनिधी) 

आज समाजात बिकट अवस्था निर्माण झाली असून मुलांना मुली मिळत नाही. आपणा सर्वांना खाली मान घालण्याची आता वेळ आलेली आहे .सोनोग्राफी म्हणजे आई आणि बाळात काही समस्या आहे का ? यासाठी केली जाणारी तपासणी होय. परंतु सोनोग्राफीचा दुरुपयोग भ्रूणहत्येसाठी केला गेला तो वाढत गेल्याने या समस्या वाढल्या. आता ती "पणती" जपून ठेवण्याची वेळ आली असे प्रतिपादन डॉ. उमा कुलकर्णी यांनी केले वीरगाव येथील ग्रामपंचायत मध्ये लेकीच्या जन्माचे स्वागत या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. सरपंच प्रगती वाकचौरे, यांनी मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये आशा सेविका, अंगणवाडी, मदतनीस आणि नर्स असे तब्बल 34 बालक आणि आईचे स्वागत करण्यात आले. कुलकर्णी म्हणाल्या की, घर चालविणे सोपे काम नाही. तसेच स्त्री किती मोठी झाली अथवा मोठ्या पदावर गेली तरी तिची घर कामापासून सुटका नाही. स्त्री गृहिणी आहे म्हणून घर नीट चालतात. महिलांकडे खूप ताकद आहे त्याचा वापर करता आला पाहिजे. सुप्रजा निर्माण व्हावी यातूनच छत्रपती शिवाजी जन्माला आले पाहिजे. तसेच सोनोग्रफी, आयुर्वेद, पुसवन विधी आदि बाबत डॉ. उमा कुलकर्णी यांनी मौलिक मार्गदर्शन केले स्त्री हट्ट, बालहट्ट सोडला पाहिजे. सौभाग्य म्हणजे माणूस गेल्याने संपेल असे नव्हे असेही त्या म्हणाल्या. 

सीमा वाघचौरे यांनी एकल महिलांचे दु: ख काय समस्या काय आहेत याबाबत सांगतांना मुलगी जन्माला येताच तिच्या बद्दल समाजा मध्ये वेगळी भावना निर्माण होते. हे चुकीचे आहे. स्त्री आणि बालकाचे नीट संगोपन करा स्त्रियांना शिक्षणाचे विचाराचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे. वीरगाव हे शिवाजी महाराजांची जहागिरी होती. राजमाता जिजाऊंचे शिवाजींराजांना मोलाचे मार्गदर्शनही मिळाले असे सीमा वाकचौरे यांनी सांगितले. 

सरपंच प्रगती रावसाहेब वाकचौरे यांनी मानधन न घेता त्यामध्ये काही रक्कम टाकून वीरगाव या ग्रामीण भागात मुलीच्या जन्माचे स्वागत एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यांनी या संकल्पनेतून आशा सेविका, अंगणवाडी, मदतनीस आणि नर्स असे तब्बल 34 बालक आणि आईचे कौतुक करत मुलाला ड्रेस, आईला साडी आणि खाऊ भेट देण्यात आला.  

----- Advertisements -----

यावेळी रावसाहेब वाकचौरे, उपसरपंच जयवंत सीताराम थोरात ,सदस्य सारिका वाकचौरे, रंजना पथवे , माया माळी, सारिका राक्षे, स्मिता भागवत वाकचौरे, गीता आवारी, विद्या थोरात, तृप्ती डोळस, वर्षा नेहे परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून डॉ. उमा कुलकर्णी, सीमा वाकचौरे आदि मान्यगन महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सविता वर्पे यांनी केले तर प्रास्ताविक वर्षा नेहे यांनी केले. आभार तृप्ती डोळस यांनी मानले.

कठीण काळातही आत्मविश्वास ठेवा.

महात्मा गांधी
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin