सत्ता आणि स्वार्थासाठी मार्ग बदलणार नाही - शिरीष चौधरी :-
धम्मयात्रेत अलोट जनसागर दादासाहेब रूपवतेंची जन्मशताब्दी साजरी
अकोले { प्रतिनिधी }
आता परिस्थिती बदलली आहे. सत्ताधाऱ्यांकडून चांगला दबाव वाढत असल्याचे सांगत भाजपमध्ये कधी येताय अशी विचारणा केली गेल्याचे चौधरी यांनी सांगितले. परंतु तीन पिढ्यापासून आमच्या बाप जाद्याने आम्हाला समतेचा लढा दिला. दादासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन निघालेलो आम्ही स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी आपला मार्ग बदलणार नाही एकवेळ या विरोधात आपण विद्रोह करू आलेल्या वादळाला ठामपणे शेवटच्या श्वासापर्यंत लढा असे प्रतिपादन आमदार शिरीष चौधरी यांनी केले. भंडारदरा शेंडी येथे माजी मंत्री दादासाहेब रूपवते यांच्या जन्मशताब्दी निमित्त धम्म यात्रेचे आयोजन केले होते त्यावेळी चौधरी बोलत होते. चौधरी पुढे म्हणाले की, आपले संपूर्ण जीवन समतेसाठी समर्पित झाले असून अखेरच्या श्वासापर्यंत समतेसाठी हा लढा देत राहणार असून दादासाहेब रुपवते हे तुम्हा आम्हासाठी प्रेरणास्त्रोत होते.
समाजाच्या सुखदुःखाची जाणीव दादासाहेबांमुळे आम्हाला झाली. एकप्रकारे आमच्यावर समतावादी विचार बिंबवल्या गेले त्याची तीव्र जाणीव निर्माण झाली. आपला झगडा हा समाजा हितासाठी असावा असेही ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री दादासाहेब रूपवते "जन्मशताब्दी स्मृती ग्रंथाचे" प्रकाशन प्रमुख अतिथी म्हणून भन्ते नागघोष ,भन्ते तेरासावा ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा डॉ. भिमराव आंबेडकर, माजी आमदार वैभव पिचड, साहित्यकार डॉ. रावसाहेब कसबे , आ. शिरिष चौधरी , धम्मयात्रेचे सभा अध्यक्ष ॲड. संघराज रुपवते , बी. आर. कदम अध्यक्ष बहुजन शिक्षण संघ, अ.नगर , एमडी सोनवणे विश्वस्त बहूजन संघ वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ख्यातनाम गायक संदेश उमप आणि संपूर्ण रूपवते परिवार तसेच मुंबई , पुणे ' नाशिक ,नगर आदि ठिकाणाहुन आलेले पदाधिकारी विविध मान्यवर उपस्थित होते.
----------------------------------
ॲड. विकास जगताप सर
मो. 9922876008 / 8999503447
-------------------------------------
आपणास विनंती आहे की , अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या हक्काच्या -
राजगृह न्युज चॅनलला -
https://rajgriha.in/
युट्युब चॅनेलला -
https://youtube.com/@prof.vikasb.jagtapsir.7282?si=7hRUIOgJNM4lqyLl
फेसबुक पेजला -
https://www.facebook.com/share/18JqJ2BzDU/
व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा -
https://chat.whatsapp.com/HjMw7i3tZZ0K9okXPm9KHi
व्हॉटसॲप चॅनलला -
https://whatsapp.com/channel/0029Vasu8HZIt5s4Z3apXH45
जास्तीत जास्त लोकांनी लोकांपर्यंत
# लाईक करा @
# शेअर करा @
# सबस्क्राईब करा @
*कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..*