मनोरंजन

समतेच्या लढाईसाठी एकत्र येऊन समतेचे युद्ध लढावे लागेल :- थोरात

Blog Image
एकूण दृश्ये: 244

समतेच्या लढाईसाठी एकत्रित लढा द्यावा लागेल :- थोरात

माजी मंत्री दादासाहेब रूपवते जन्म शताब्दी निमित्त धम्म यात्रेचे आयोजन 

अकोले [ प्रतिनिधी ]

देशामध्ये आता विषमतावाद, एकेश्वरवाद वाढत असून यास विरोध करण्यासाठी आणि समतेच्या लढाईसाठी सर्वांनी एकत्रित येऊन समतेची लढाई लढण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केले. भंडारदरा शेंडी येथे धम्म यात्रे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.

----- Advertisements -----

धम्मयात्रा आणि दादासाहेब रूपवते यांची जन्मशताब्दी निमित्त प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर, थोर विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे , दादासाहेब रुपवते यांच्या सहचारिणी सुशीलाबाई रूपवते , आ. शिरिष चौधरी , बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त आणि धम्मयात्रेचे सभा अध्यक्ष ॲड. संघराज रुपवते , बी. आर. कदम, अध्यक्ष बहुजन शिक्षण संघ, अ.नगर ,वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते ,भन्ते नागघोष ,भन्ते तेरासावा , माजी आमदार वैभव पिचड, ख्यातनाम गायक संदेश उमपसह संपूर्ण रूपवते परिवार तसेच मुंबई , पुणे ' नाशिक , अहिल्यानगर आदि ठिकाणाहून आलेले विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. थोरात पुढे म्हणाले की, आता एकूणच देशाच्या आणि राज्याच्या राजकीय सामाजिक वातावरणामध्ये दोन गट तयार झालेले आहेत. त्यामध्ये आरएसएस विचारांचा विषमतावादी गट आणि दुसरा आपल्या सर्वांचा समतावादी , संविधानवादी , आंबेडकरवादी विचारांचा एक गट. आता आपल्याला ही लढाई भविष्यात एकत्र येऊन लढावी लागेल. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. असे आवाहन यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. दादासाहेब रूपवते यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देतांना ते म्हणाले की, भाऊसाहेब थोरात आणि दादासाहेब रुपवते दोघेही अत्यंत जवळचे मित्र होते. या सौहार्दपूर्ण मैत्रीचे रूपांंतर थोरात आणि रुपवते परिवाराच्या कौटुंबिक जिव्हाळ्यातून एक घनिष्ठ ऋणानुबंध आणि एकोपा निर्माण झाला. हे द्वयी एकमेकांना मार्गदर्शन करत असत. माझ्या जडणघडणीत, राजकीय जीवनात दादासाहेबांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे थोरात म्हणाले. संगमनेर अकोल्यात खऱ्या अर्थाने परिवर्तनाची लढाई दादासाहेब रुपवते यांच्या नेतृत्वाखाली केली गेली. त्यातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली गेली. भविष्यातील नियोजन, धोरण, कृतिशील आराखडा तयार केला गेला. माझ्या राजकीय प्रवासामध्ये नेहमीच ते मार्गदर्शक राहिले. तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या मार्गदर्शनामुळे चर्चा घडले. 

कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रामध्ये प्रथमत: धम्म ध्वजाचे ध्वजारोहण ग्रामीण विभाग ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर उपस्थित भन्ते नागघोष , भन्ते तेरासावा आणि इतर बौद्ध भिक्खु गणाच्या मार्गदर्शनाखाली धम्मदेसना देण्यात आली. यावेळी मुंबई ,पुणे ,नाशिक , अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. याप्रसंगी प्रत्येक गावातून शहरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक ,धार्मिक शैक्षणिक , राजकीय प्रश्न आणि इतर समस्या मांडण्यात आल्या. मुंबई ,पुणे छत्रपतीसंभाजी नगर येथील अनेक पुस्तक विक्रेत्यांनी पुस्तकांची स्टॉल लावले त्यास चा़ंगला प्रतिसाद मिळाला.

----- Advertisements -----

यशस्वी माणूस तोच, जो प्रत्येक संकटाला संधी म्हणून पाहतो.

अज्ञात
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin