मनोरंजन

पक्ष एका जातीचा धर्माचा नसावा :- डॉ भीमराव आंबेडकर धम्म यात्रेत डॉ भीमरावांची भीम गर्जना

Blog Image
एकूण दृश्ये: 42

पक्ष एका जातीचा धर्माचा नसावा :- डॉ भीमराव आंबेडकर 

धम्म यात्रेत डॉ भीमरावांची भीम गर्जना

   अकोले { प्रतिनिधी }

रिपब्लिकन पक्षा कसा असावा ही संकल्पना बोधिसत्व डॉ. बाबासाहेबांनी मांडली त्या मार्गाने आम्ही गेलो नाही त्यामुळेच आम्हाला राजकीय यश प्राप्त झाले नसल्याची खंत डॉ भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केली. 1957 चा काळ हा आरपीआयचा सुवर्णकाळ होता. पक्ष एका जातीचा धर्माचा नसावा असे आंबेडकरांचे विचार होते.

----- Advertisements -----

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्येय विचार अंगिकारले पाहिजे असे मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केले. 

भंडारदरा शेंडी येथील मूलगंध कुटी जेतवन या ठिकाणी शुक्रवार 28 फेब्रुवारीला धम्म यात्रेचे आयोजन केले होते त्यावेळी धम्म सभेत ते बोलत होते. यावेळी आंबेडकर यांना समता सैनिक दलाच्या वतीने पंचशील ध्वजारोहणसह त्यांना मानवंदना देण्यात आली. समाजकार्याची, धर्मकार्याची, शिक्षणाची, राजकारणाच्या अशा विविध पातळीतून आणि दुसऱ्या फळीतून तावून सुलाखून निघालेले त्यांचे जीवन होते. त्यांच्या विचाराने प्रत्येकजण आज वेगवेगळ्या क्षेत्रात उंची गाठून बसलेला आहे. आपला नेता गेला त्यासाठी आपणा काहीतरी केले पाहिजे .समाजाशी नाळ जोडली गेलेली हवी. आपल्याला राजकारणात यश संपादन करायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्येय आणि विचार अंगिकारले पाहिजे. असेही ते म्हणाले. दादासाहेबांना प्रबुद्ध भारताची जबाबदारी दिली. जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया अशा अनेक दिग्गज राजकीय नेत्यांशी त्यांचा पत्रव्यवहार होता. काँग्रेसच्या विरोधात एक अल्टरनेटिव विचार उभा करण्याचे काम त्यांनी केले. कारण रिपब्लिकन नेते बोलत असताना नेहरू सुध्दा काळजीपूर्वक ऐकत असत. दादासाहेब गायकवाड, एम शिवराज, बी सी कांबळे, आर डी भंडारी, बॅरिस्टर खोब्रागडे, भैय्यासाहेब, दादासाहेब रूपवते असे दिग्गज नेते आरपीआय मध्ये होते एवढे बुद्धीवादी नेते काँग्रेसमध्येही नव्हते. 1957 चा काळ हा आरपीआयचा सुवर्णकाळ होता. म्हणूनच पक्ष एका जातीचा धर्माचा नसावा असे आंबेडकरांचे विचार होते. आंबेडकर. विचार व्यक्त करतांना ते म्हणाले की, सैनिकी सेनावासात आंबेडकरांनी जीवन व्यतीत केले आजही बंगला नंबर सात आठ नऊ मध्ये या मिलिटरी बॅरिकेट्सला केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी स्मारक करावे यासाठी सहा महिन्यापूर्वीच आपण डिफेन्स मिनिस्टर रघुनाथ सिंह यांची भेट घेऊन याबाबतचा प्रस्ताव मांडल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भन्ते नागघोष ,भन्ते तेरासावा साहित्यकार डॉ. रावसाहेब कसबे , आ. शिरिष चौधरी , धम्मयात्रेचे सभा अध्यक्ष ॲड. संघराज रुपवते , बी. आर. कदम अध्यक्ष बहुजन शिक्षण संघ, अ.नगर , वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते , महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक संदेश उमप आणि संपूर्ण रूपवते परिवार तसेच मुंबई , पुणे ' नाशिक ,नगर आदि ठिकाणाहुन आलेले पदाधिकारी विविध मान्यवर उपस्थित होते.

-------------------------------

ॲड. विकास जगताप सर

----- Advertisements -----

 मो. 9922876008 / 8999503447

-----------------------------------

आपणास विनंती आहे की , अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या हक्काच्या -

राजगृह न्युज चॅनलला -

 https://rajgriha.in/

----- Advertisements -----

युट्युब चॅनेलला -

https://youtube.com/@prof.vikasb.jagtapsir.7282?si=7hRUIOgJNM4lqyLl

फेसबुक पेजला -

https://www.facebook.com/share/18JqJ2BzDU/

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा -

----- Advertisements -----

https://chat.whatsapp.com/HjMw7i3tZZ0K9okXPm9KHi

व्हॉटसॲप चॅनलला -

https://whatsapp.com/channel/0029Vasu8HZIt5s4Z3apXH45

जास्तीत जास्त लोकांनी लोकांपर्यंत

 

----- Advertisements -----

 # लाईक करा @

 # शेअर करा @

 # सबस्क्राईब करा @

कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..

----- Advertisements -----

स्वत:ची किंमत ओळखली, तर जग जिंकल्यासारखे आहे.

संत एकनाथ
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin