मनोरंजन

घोसाळे परिवाराच्या वतीने कालकथित मीराबाई विठ्ठल घोसाळे आईच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ दिशादर्शक कार्यकर्त्यांच्या सहचारिणींचा आदर्श माता गौरव पुरस्काराने आदरपुर्वक सन्मान !

Blog Image
एकूण दृश्ये: 744

घोसाळे परिवाराच्या वतीने कालकथित मीराबाई विठ्ठल घोसाळे आईंच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ आणि  दिशादर्शक कार्यकर्त्यांच्या सहचारिणींचा आदर्श माता गौरव पुरस्काराने आदरपुर्वक सन्मान

अकोले प्रतिनिधी

तालुक्यातील गणोरे येथे रविवार दि. २३/०३/२०२५ रोजी आंबेडकरी चळवळीत‌‌ युवा कार्यकर्ते डॉ रविंद्र घोसाळे सर यांच्या आई कालकथत मिराबाई विठ्ठल घोसाळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य उद्देेेश आईंच्या स्मृती दिनानिमित्त  सामाजिक ,राजकीय ,धार्मिक , शैक्षणिक , कृषी आणि कौटुंबिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानात त्या कुटुंबातील आदर्श महिलांचाही तितकाच सिंहाचा वाटा असतो. पण त्यांना मात्र कोणताही सन्मान यापासुन दुर अर्थात वंचित ठेवलं जाते अशी या मातेची संकल्पना होती.  तीच संकल्पना आज मुलांच्या माध्यमातून आईच्या स्वप्नपूर्ती विचारांचा वसा पुढे घेऊन जाण्यासाठी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध भागातील आजच्या दि. २३ मार्च २०२५ हा घोसाळे परिवारातील आईच्य स्मृती दिनानिमित्त २३  आदर्श मातांना आदर्श माता गौरव पुरस्कार सन्मानचिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले.

या वेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सौ. दुर्गाताई तांबे , अँड मंगलाताई हांडे  व कुसुमताई कसबे  यांच्या शुभहस्ते या २३ आदर्श मातांचा आदर्श गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय  बनसोडे सर होते. या कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमांचे व आई - वडील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व धार्मिक विधी संकलन बौद्धाचार्य गौतम भालेराव यांनी केले.

----- Advertisements -----

यावेळी संगमनेर, अकोले तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील, सामाजिक ,धार्मिक , राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कालकथित मिराबाई विठ्ठल घोसाळे यांच्या आठवणींना उजाळा देत मनोगत आदरांजली व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी घोसाळे परिवारावर प्रेम करणारे‌ नातेवाईक, सगेसोयरे, सामाजिक धार्मिक राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि  प्रास्ताविक विनयजी घोसाळे सर यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार या आईंचे कर्तव्यदक्ष मुलगा डॉ. रविंद्र घोसाळे सर यांनी मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगता बौद्धाचार्य गौतम भालेराव यांनी शरणतय गाथा घेऊन केली.

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin