आम्हाला ओल्ड इंडिया, न्यू इंडिया नको, आम्हाला ब्लू इंडिया हवा :- ॲड. संघराज रूपवते
अकोले (प्रतिनिधी)
माणूस नीतीमान नसेल तर भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीचे नेतृत्व करूच शकत नाही. गतिमान आहे ते नीतिमान नाही , नीतिमान आहे ते गतिमान होत नाही. ही आपली व्यवस्था आहे. आयुष्यात मोठ व्हायचं असेल तर माणसाकडे बुद्धी पाहिजे.
आम्ही सर्व सम्राट अशोकावाले आहोत. एकीकडे संघ परिवार तर दुसरीकडे संविधानवादी परिवार असून भारताची घटना ही समतावादी आहे. एका हातात धर्मग्रंथ आणि दुस-या हातात संविधान असा प्रवास होऊच शकत नाही असे मौलिक प्रतिपादन ॲड. संघराज रूपवते यांनी केले. भंडारदरा ,शेंडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत जवळचे सहकारी आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व माजी मंत्री दादासाहेब रूपवते यांच्या जन्मशताब्दी निमित्त धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ॲड. संघराज रूपवते बोलत होते.
रूपवते म्हणाले की, भारत प्रबुद्ध होऊ शकत नाही. अशी खंत व्यक्त करून भारत हा निर्बुद्ध होत चालला असल्याचे ते म्हणाले. आम्हाला ओल्ड इंडिया नको, न्यू इंडिया नको, आम्हाला ब्लू इंडिया हवा असे संघराज रूपवते म्हणाले.
शेंडी येथील धम्मयात्रा आणि दादासाहेब रूपवते यांचा जन्मशताब्दी सोहळ्या निमित्त प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर, महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , थोर विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे , दादासाहेब रुपवते यांच्या सहचारिणी सुशीलाबाई रूपवते , आ. शिरिष चौधरी , बी. आर. कदम - अध्यक्ष - बहुजन शिक्षण संघ, अ.नगर ,वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते ,भन्ते नागघोष , भन्ते तेरासावा , माजी आमदार वैभव पिचड , महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक संदेश उमप आणि संपूर्ण रूपवते परिवार तसेच मुंबई , पुणे ' नाशिक , अहमदनगर आदि ठिकाणाहून आलेले विविध मान्यवर उपस्थित होते.