विद्यार्थ्यांच्या उणिवा दूर करा : प्रमोद गायकवाड विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; शालेय साहित्याचे वाटप
अकोले { भारत रेघाटे }
विद्यार्थी दशेत असताना शालेय जीवनात अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो. त्यामध्ये शालेय साहित्याची उणीव भासल्यास भविष्य अंधकारमय दिसतं परंतु विद्यार्थ्यांना धीर देत त्यांची उमेश जागृत करत त्यांची गरज ओळखून अशा गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच्या वस्तू भेट रुपी दिल्या तर त्या विद्यार्थ्यांमध्ये उमेद जागृत होते .त्यांना प्रेरणा मिळते असे प्रतिपादन प्रमोद गायकवाड यांनी केले.

अकोले ब्राह्मणवाडा येथील मातोश्री लक्ष्मी सांगारे प्राथमिक आश्रम शाळा व प्राथमिक केंद्र शाळा ब्राह्मणवाडा येथे भारतीय बौद्धजन विकास समिती यांच्याकडून शालेय वस्तूचे वाटप उपक्रम कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय बौद्ध विकास समिती पिंपरी - चिंचवड, मावळ व पुणे यांच्या अंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन करत शैक्षणिक साहित्य संकलन व वितरण करण्यात आले.
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्याच्या जीवनातील कमतरतेची जाणीव प्रत्येक व्यक्तीला झाली पाहिजे या जाणिवेतून त्यांची उणीव दूर करण्याचे काम सहकार्याने सहयोगातून होत असते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेल्या हास्य शाळेसाठी ऊर्जा स्तोत्र बनेल असेही ते म्हणाले. या उपक्रमासाठी समितीचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, शाळेचे सचिव अविनाश संगारे संस्थेचे माजी अध्यक्ष साळुंखे ब्राह्मणवाडा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पोपटराव हांडे मुख्याध्यापक शिक्षकवृंद नालंदा जनसेवा प्रतिष्ठानचे रामदास इंगळे, अनिता इंगळे, उर्मिला सोनवणे, आशा शिंदे, उत्तम मोरवेकर, राजेंद्र वाघमारे, संजय सोनकांबळे, ग्रामस्थ आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन गौतम शिंदे यांनी केले असून मोलाचे योगदानही लाभले.
