धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट; कोतुळात तणाव माहिती व कार्यवाही बाबत पोलिसांची उदासिनता
अकोले (प्रतिनिधी ) ~
श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला कोतुळ गावात अकोले तालुक्यातील कोतुळ गावात सोशल मीडियावर एका व्यक्तीने औरंगजेब हा हिंदुस्थानचा बाप असल्याची पोस्ट शेअर केल्याने कोतुळसह अकोले तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदरची घटना मंगळवार दि. 26 रोजी ही घटना घडल्याने कोतुळ गावात पोलीस फोज फाट्यासह दाखल झाले होते.

एका व्यक्तीने यापूर्वीही महिन्यापूर्वी असाच प्रयत्न केल्याचे आजच्या घटनेवरून लक्षात येते. सदर व्यक्तीने औरंगजेब हा हिंदुस्थानचा बाप असल्याचे स्टेटस ठेवल्याने याची माहिती हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजताच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत दुकान गाठले . काही ग्रामस्थांनी व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कान उघाडणी केली. एवढेच नव्हे तर पोस्ट टाकल्याचे त्याने कबूलही केले. यापुढे सामाजिक तेढ अथवा दोन समाजात भेदभाव होणार नाही तद्वतच अशा पोस्ट टाकणार नसल्याची कबुली दस्तुरखुद्द आरोपीनेच दिली.
अकोले पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची शहानिशा केली जात होती. सोशल मीडियावर टाकलेल्या धार्मिक संदेशाचे पोलीस फारशे गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून आले. याबाबत पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्याशी संपर्क करूनही माहिती देण्याचे टाळले. पोलिस यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप काही हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे . ग्रामस्थांच्या वतीने अकोले पोलिसात फिर्याद दिली..याबाबत रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

