प्रगती गजेला दहावीला 91.20 गुण ; सर्वत्र होतोय अभिनंदनाचा वर्षाव
अकोले
नुकत्याच झालेल्या इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत प्रगती भाऊसाहेब गजे हिने 91.20% गुण संपादन केल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अकोल्यातील कन्या विद्या मंदिराची प्रगती ही विद्यार्थिनी आहे.
आई-वडील मोठी बहीण ही माझी प्रेरणा असून मला सर्वच शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे त्यामुळेच यश संपादन करता आले. मी त्यांची आभारी असल्याचे ती म्हणाली. विज्ञान शाखेतूनच मला करिअर करायचे आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत भविष्यात येणाऱ्या संधीचा फायदा घेत माझे भवितव्य घडवणार आहे. सर्व सामान्य कुटुंबातील प्रगती ही शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. आई वडील शेती करतात. मोठी बहीण पल्लवी बीएससी ऍग्री करते. तर आई शेतीच्या कामातही मदत करत असते.
सामाजिक कार्यकर्ते बाबा नाईकवाडी म्हणाले की, प्रगतीची जिथे चिकाटी आणि अभ्यासाला महत्त्व दिल्यानेच दहावीत मोठ्या गुणांकाने यश संपादन केले आहे. हे यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे. प्रगतीची प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनात प्रगती करावी. मुलांचे कौतुक करा. त्यांना प्रेरणा द्या. तेच या देशाचे भविष्य आहेत असे नाईकवाडी म्हणाले.

