ब्रेकिंग न्यूज :
भारत

पोलीस किशोर तळपे यांचे निधन ; शासकीय इतमामात अंतिम संस्कार

Blog Image
एकूण दृश्ये: 339

पोलीस किशोर तळपे यांचे निधन ; शासकीय इतमामात अंतिम संस्कार ; अकोले राजूर हळहळले

    अकोले { प्रतिनिधी } 

अकोले शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार किशोर लक्ष्मण तळपे वय 42 हे कर्तव्यावर हजर असताना  २९ जून ला हृदयविकाराने निधन झाले.

कॉन्स्टेबल म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. अकोल्यात येण्यापूर्वी त्यांनी राजुर पोलिसात काही वर्ष काम केले. आपल्या वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर त्यांना नोकरी मिळाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात सलामी देत  त्यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल  वातावरणात  सोमवार दि ३० जून ला  डोळासणे येथे अंतिम संस्कार करण्यात आले. 

यावेळी पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे अकोल्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे त्याचबरोबर अकोले शहर, संगमनेर शहर राजूर पोलीस सहयोगी राजकीय, सामाजिक, शिक्षण, आदि क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

----- Advertisements -----

अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेले किशोर तळपे दादा म्हणून सर्वांच्या परिचयाचे होते. प्रत्येक व्यक्तीला आदराने बोलणारे, वागणारे असे त्यांचे वर्तन होते. अत्यंत शांत ,सुस्वभावी  सहकार्याची भावना नेहमीच होती. त्यांच्या निधनाबद्दल अनावकर होत अनेक मित्रांनी आपल्या त्यांच्याविषयी सद्भावना व्यक्त केल्या. त्यांच्या अचानकपणे जाण्याने पोलीस क्षेत्रात एक वेगळी पोकळी निर्माण झाली.

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin