ब्रेकिंग न्यूज :
भारत

मद्यधुंद शिक्षकाने चिरडले दोन पादचारी

Blog Image
एकूण दृश्ये: 134

मद्यधुंद शिक्षकाने चिरडले दोन पादचारी ; एक ठार, एकाची प्रकृती चिंताजनक  ससून रूग्णालयात दाखल

      अकोले :प्रतिनिधी  

बेदरकार वाहनचालकामुळे अकोले परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. राजूर येथील एका शिक्षण संस्थेत शिक्षक असलेला चालक मद्यधुंद अवस्थेत चारचाकी चालवत असताना दोन पादचाऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना अकोले देवठाण रोडवर घडली.

    या अपघातात दिलीप लक्ष्मण घुले ५८,अकोले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून राजेंद्र लिंबा डोके खानापूर हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

      हा अपघात दि. २७ ऑक्टोबर ला सायंकाळी ६.ते ७ वा. दरम्यान घडला एम एच 17 सी. आर. 779 कार भरधाव वेगाने आली. वाहनचालकाने नियंत्रण गमावून दिलीप घुले व राजेंद्र डोके या दोघांना जोरदार धडक दिली आणि घटनास्थळावरून पसार झाला.

गंभीर जखमी झालेल्या दिलीप घुले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेंद्र डोके यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना  पुण्यातील ससून रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 

----- Advertisements -----

     पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेतला असता तो श्रीकांत विष्णू घाणे राजूर हा एका शिक्षण संस्थेतील शिक्षक असल्याचे उघड झाले. फिर्यादी अक्षय दिलीप घुले यांच्या तक्रारीवरून अकोले पोलिस आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम १०६ ( १ ), २८१, १२५ ( अ ) ( ब ) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४ ( अ) ( ब ), १७७, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल भारती करीत आहेत.

 

जीवन हे एक प्रवास आहे, गंतव्य नव्हे.

महात्मा गांधी
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin