महिला हनी ट्रॅपचा आर्थिक बळी ठरला युवक ; हनी ट्रॅपने संगमनेर, अकोले, सिन्नर तीन तालुके हादरले ; हनी ट्रॅपच्या महानाट्यात राजकीय, बडे व्यावसायिक अडकले असल्याच्या चर्चेला उधाण
संगमनेर अकोले : { भारत रेघाटे }
मला तुम्ही आवडता असे म्हणत महिलांनी एका 37 वर्षीय चिरतरुण असलेल्या पुरुषास प्रेमाच्या जाळ्यात ओढून ,प्रेमाचे चाळे करून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन घडलेला प्रकाराचे फोटो, व्हिडिओ, चित्रिकरण, माहिती सोशल मीडियावर व्हायरल करून जिवे मारून टाकू तसेच तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार करण्याची धमकी देत तब्बल एक लाख रुपयाला ठगविल्याचा प्रकार उघडकीस आल्याने या घटनेने संगमनेर, अकोले, सिन्नर तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत काही राजकीय आणि बडे व्यवसायिक शामील असल्याची चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे.

एका पुरुषासोबत संपर्क वाढवून, तसेच फोन, चॅटिंग करत मला तुम्ही आवडता असे म्हणत एका 37 वर्षीय तरुण असलेल्या पुरुषाला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन व दुसऱ्या महिलांचे नंबर देऊन प्रेमाच्या जाळ्यात फसवत त्याच्याकडून लाख रुपये उकळण्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील एका व्यक्तीवर अकोल्यात बितला. तसेच वारंवार तगादा लावून पैशाची मागणी करून तसेच जीवे मारण्याची धमकी देत फोटो, व्हिडिओ व्हायरल करू असा दम भरत 84 हजार रुपये उखळण्यात आले. वारंवार धमकी आणि पैशाच्या मागणीने वैतागलेल्या या 37 वर्षाच्या पुरुषाने अकोले शहर पोलिसात फिर्याद दिली फिर्यादीवरून सिन्नर येथील त्यांचे साथीदार या़च्या विरोधात संशयित भारतीय न्याय संहिता 308 (3) 318, 351, 352, 3 (5 ) प्रमाणे अकोले पोलीसात प्राजक्ता रावसाहेब मुंगसे, कविता विशाल विधाते, छाया संजय धुमाळ, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेन ज्या व्यक्तीचा नंबर दिला त्या मामाचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच या मध्ये अजून काही बडे व्यक्ती असून ते निष्पन्न झालेले नाहीत, त्यांचाही कसून शोध घेतला जात आहे. आरोपीना नोटीस बजावण्यात आली आहे.

या घटनेत पोलीसांनी सापळा रचून संगमनेर कडून अकोलेच्या दिशेने येत असलेल्या रिक्षा क्रमांक एम एच 15 जे. ए . 3932 महात्मा ज्योतिबा फुले चौकात रिक्षात आलेल्या महिलेसह तिच्या साथीदाराला 6 हजाराची रक्कम घेताना रंगेहात पकडले. या प्रकरणात काही महिला आणि पुरुष साथिदारांचा समावेश असण्याची शक्यता असून पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबेहेरे करीत आहेत.
या हनी ट्रॅप मध्ये महिलांनी ओळखीचा फायदा घेऊन कट कारस्थान करत वेळोवेळी ऑनलाइनच्या माध्यमातून तर कधी रोख रकमेच्या स्वरूपात सदर व्यक्ती कडून पैसे काढून घेतले. यापूर्वी त्या महिलेस 84 हजार रुपये दिले. दरम्यान मागणी वाढत गेल्याने व्यूहरचना करत बोलावण्यात आले. सदर महिला अकोले येथील महात्मा फुले चौकात रिक्षा एम. एच. 15 जे एक 3932 यामधून तिच्यासोबत तिचा साथीदार रिक्षातून उतरले असता त्यांना 6 हजाराची रोख रक्कम देताना अकोले पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले. पुरुषा सोबत झालेल्या हनी ट्रॅपने संगमनेर, अकोले , सिन्नर, तालुक्यासह नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली .
