ब्रेकिंग न्यूज :
भारत

काही तासात वाखोरीत दोन बिबटे पकडले ; ग्रामस्थांच्या संतापाने वन अधिकारी बिबट्याच्या मागावर ;

Blog Image
एकूण दृश्ये: 149

काही तासात वाखोरीत दोन बिबटे पकडले ; ग्रामस्थांच्या संतापाने वन अधिकारी बिबट्याच्या मागावर ; बिबट्याच्या हल्यात अवघ्या पावने तीन वर्षाच्या चिमुकलीचा करूण अंत; सांत्वन भेटीतून आमची माणसे परत येणार का ? नातेवाईक ग्रामस्थांचा संत सवाल

   अकोले ; प्रतिनिधी

देवठाण गावातील हिवरगाव रोड लगत असलेल्या शेळके वस्ती नजिक राहणाऱ्या लहानू पोपट गांगड यांच्या पावने तीन वर्षीय कविता नावाच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दूर्दवी घटना समोर आली आहे. या घटनेने अकोले शहरासह तालुका हादरून गेला. गेल्या दोन आठवड्यातील तिसरी ते चौथी घटना आहे. सांत्वन करून आमची माणसे परत येणार नाहीत . नरभक्षक बिबट्यांनी परिसरात उच्छाद मांडला असून नागरिकाचा संताप अनावर झाल्याने वनाधिकाऱ्यांनी अखेर दोन बिबट्याला जेरबंद केले असून परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी वन अधिकारी आणि रेस्क्यू टीम रानोमाळ सैरभैर होत बिबट्यांचा शोध घेत आहे. 

संतप्त झालेल्या जमावाने वनाधिकाऱ्यांना सवाल केला की, आम्ही बिबट्याला काही इजा केल्यास आमच्यावर गुन्हे दाखल होतील ! मग आमचे माणसे मारली जातात आम्ही कोणावर गुन्हे दाखल करायचे ? असा प्रती सवाल संतप्त झालेल्या जमावाने यावेळी वन अधिकाऱ्यांना केला.  

     गेल्या काही वर्षापासून अकोले सह संगमनेर तालुक्यात बिबट्याची चांगलीच दहशत वाढली असून झालेल्या हल्ल्यात काहीजण मृत झाल्याने नरभक्षक बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी अकोल्यात जमावाने केली. 

----- Advertisements -----

     देवठाण येथिल रहिवासी असणाऱ्या शेळके वस्ती जवळच ही घटना घडली. ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. तद्नंतर वनविभागाचे कर्मचारी आले. तब्बल ३०० मीटर दूर अंतरावर छिन्नविछिन्न अवस्थेत छोट्या कविताचा मृतदेह ऊसाच्या फडात आढळून आला. याबाबत गांगड यांनी अकोले पोलिसात तक्रार दिली आहे. देवठाण ग्रामस्थांनी घटने बाबत संताप व्यक्त केला आहे. काही दिवसापूर्वी देवठाण गावातील रामहरी काळे यांच्या वस्तीवर ही हल्ला केला होता या हल्यात विठावाई रामहारी काळे यांचा मृत्यू झाला होता. 21 सप्टेंबरला पप्पू दुधवडे 22 वर्षीय मजुरी करणाऱ्या आदिवासी मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तसेच बेलापूर बदगी गावात दिवसाढवळ्या शेतकरी मजुरांना बिबट्याचे नेहमीच दर होत असते. आता शेतात जाणे मुश्किल झाले असून रात्री सुद्धा बिबट्या वस्तीत घरात इतरत्र भक्ष शोधण्यासाठी फिरताना आढळून येतात. बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे अकोले तालुका भयभयीत झाला आहे. वनविभागाने तातडीने कारवाई करून नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली. कविताचे कोतुळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या महिन्याअखेरीस कविताचा वाढदिवसही होता. ऐन दिवाळीत या चिमुकलीचा करुण अंत झाल्याने गांगड कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. 

अकोल्यातील सुस्ताड असलेला वन विभाग झोपला की काय ? असा संतप्त सवाल नागरिक करीत असून. बिबट्या माणसे फस्त करीत असून दुसरीकडे वनविभाग मात्र सुस्त निद्रावस्थेत गाढ झालेला दिसून येत असून . वन विभागाचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याने नागरिकांनी वनविभागावर चांगले ताशेरे ओढले आहेत. वन विभागाचे अधिकारी फोन उचलत नाही. माहिती देत नाही..तसेच पिंजरे लावण्यास दिरंगाई करतात. पिंजऱ्यात कुत्रे, कोंबडी टाकल्याने बिबट्या पिंजऱ्याजवळ येत सुद्धा नाही. शेळीच्या आवाजाने बिबटे पिंजऱ्या मध्ये अडकण्याची शक्यता असते असे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्वत:ची किंमत ओळखली, तर जग जिंकल्यासारखे आहे.

संत एकनाथ