इनोव्हा दुचाकीत झालेल्या अपघातातील रामचंद्र मेंगाळ यांचे निधन ; रस्त्यातील खड्यामुळे झाला अपघात
अकोले : प्रतिनिधी
कोल्हार घोटी राज्य मार्गावरील अकोले राजूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी झालेल्या भीषण अपघातातील जखमी रामचंद्र मेंगाळ यांचे रविवार दि 21 सकाळी एस. एम. बी. टी. रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.

संगमनेर ~अकोले ते राजूर रस्त्यावर पावसामुळे असंख्य खड्डे पडले आहेत खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात या रस्त्यावर छोटे मोठे अपघात होतात. दुचाकी व इनोव्हा गाडी यांच्यात अकोले ~राजूर रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी सायंकाळी दरम्यान हा भीषण अपघात घडला होता . या अपघातात रामचंद्र लक्ष्मण मेंगाळ,वृषाली अनिल कडाळी व रोहिणी सुनिल मेंगाळ हे दुचाकी वरील तिघे जन जखमी झाले होते. यातील रामचंद्र मेंगाळ वृषाली कडाळ गंभीर दुखापत झाली होती. अपघाता नंतर जखमींना अकोले येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारा करिता दाखल करण्यात आले . तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर रामचंद्र मेंगाळ व वृषाली कडाळी यांना उपचारासाठी संगमनेर येथे हलविण्यात आले होते .
रामचंद्र मेंगाळ यांची प्रकृती खालावल्याने त्यांना घोटी येथील एस एम बी टी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली .त्यांच्या मुलाने वडिलांचे काही बरे वाईट झाले तर आपण त्याचा अंत्यविधी रोहिदास जाधव यांच्या घरासमोर करू असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज रामचंद्र मेंगाळ यांच्या निधना नंतर आंबड येथे जाधव यांच्या घरासमोर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.
यावेळी अंबड ग्रामस्थ व कार्यकर्ते हेही जाधव यांच्या घरी जमा झाले होते. त्यामुळे अंबड येथे काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान रामचंद्र मेंगाळ यांच्यावर दुपारी गर्दनी ता. अकोले येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत जखमी रोहिणी सुनील मेंगाळ हिने दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी इनोव्हा चालक रोहिदास किसन जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत.
