बस ने व्यक्तीला चिरडले ; जागीच ठार; जमावाने फोडली बस ची काच
अकोले ( प्रतिनिधी)
अकोले आगाराची बस अकोले देवगाव मार्गावर धावत असताना काल बुधवार दि. 15 रोजी सायंकाळी 7:30 च्या सुमारास एका पादाचाऱ्याला उडून बस न थांबता पुढे निघून गेली. सदर व्यक्तीच्या डोक्यावरून बस चे चाक गेल्याने या दुर्दैवी घटनेत एक 42 वर्षीय तरूण जागीच ठार झाला असून त्यांचा मृतदेह कोतूळ येथे शवविच्छेदना साठी रात्रीच रवाना करण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतरच अहवाल प्राप्त होईल. पोलिसांना याबाबत कोणतीही खबरबात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत त्यांचे नातेवाईक अकोले पोलिसात आज तक्रार दाखल करणार आहेत.

अकोले आगाराची बस बस क्र : एमएच ०६ एस ८२४९ अकोले देवगाव रस्त्यावर धावत असताना पिंपळगाव नाकविंद या ठिकाणी चालकाच्या नजरचुकीने गणपत भानुदास लगड यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने हा अपघात झाला. या अपघातात ते जागीच ठार झाले. यावेळी बस मध्ये चालक रंगनाथ विठठल पारधी, वाहक काशिनाथ बाळू हिले यांच्यासह सहा प्रवासी होते. त्यानंतर गावातील काही नागरिकांच्या मदतीने मृतदेह रा.प. दुसरी बस क्रमांक एम एच 14 बी टी 4443 ने प्राथमिक आरोग्य केंद्र कोतूळ येथे नेण्यात आला . सदर अपघातामध्ये रा प बस मधील कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. सदर अपघातास प्रथम दर्शनी रा.प.बसचे चालक रंगनाथ विठ्ठल पारधी हेच जबाबदार असल्याचे दिसून येते. अपघातनंतर तेथील संतप्त जमावाने रा.प.बसचे पुढील दर्शनी काच फोडली फोडली .
याबाबत शहर पोलिसात आज तक्रार दाखल करणार आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून. ऐन दिवाळीत ही दुर्दैवी घटना घडल्याने लगड यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

