संगमनेर { प्रतिनिधी }
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला रविवारी 27 एप्रिलला या घटनेला 84 वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने केवळ भीम सैनिकच नाही तर समस्त बहुजन समाज कोतुळात एकवटणार असून संगमनेर अकोले पंचक्रोशीतील जनसागर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे.
चला तर मग आपणही कोतुळ या गावी 84 वर्षापूर्वी झालेल्या घटनेचे आणि सुवर्णक्षणाचे साक्षीदार होऊ या ! या सोहळ्याला बाबासाहेबांचे नातू श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांची परिषद घेऊन एक इतिहास रचला. अकोले तालुक्यातील कोतुळ या छोट्याश: गावात त्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 84 वर्षांपूर्वी महिलांची परिषद घेऊन या ठिकाणी जनजागृती करण्याचे महान कार्य त्या काळी केले. आणि तो क्षण ठरला ऐतिहासिक. अकोले तालुक्यातील कोतूळ गावामध्ये त्यांचे सर्व समाजांनी एकत्र येत भव्य स्वागत केले होते. या इतिहासाच्या सुवर्णपानाला उजाळा देण्यासाठी येत्या 27 एप्रिलला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी सोहळा पार पडत आहे.
महाराष्ट्र एकसंध आहे हे दाखवून देणाऱ्या या सोहळ्याला आपण सर्वांनी हजारोंच्या संख्येने या ऐतिहासिक कार्यक्रमास आपण उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन ि वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी केले.

परिस्थिती हीच आपल्या आयुष्याची खरी परीक्षा असते.
संत तुकाराम