ब्रेकिंग न्यूज :
भारत

अपहार प्रकरणी व्दोषीवर होणार कार्यवाही ; कर्मचाऱ्यांनीच केला होता प्रताप

Blog Image
एकूण दृश्ये: 58

कोतूळच्या आदिवासी विविध कार्यकारी सेवा सोसायटीत अपहार प्रकरणी व्दोषीवर होणार कार्यवाही ; कर्मचाऱ्यांनीच केला होता प्रताप

     अकोले : प्रतिनिधी 

तालुक्यातील कोतूळ येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सोसायटीत ६० लाखांचा अपहार झाल्याचा घोटाळा उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

     याबाबत सेवा सोसायटीचे संचालक व सभासदांनी तक्रार केली असून तसे निवेदन सहायक निबंधक अकोले, सहकार आयुक्त, सहकार मंत्री, राज्य सहकार आयुक्त यांना दिले आहे.

----- Advertisements -----

    कोतूळ येथील सेवा सोसायटीचे  २०२४ -२५ चे वैधानिक लेखापरीक्षण करण्यात आले. त्यात संस्थेतील कर्मचारी दादाभाऊ रामभाऊ साबळे (सचिव) दीपक शरद परशुरामी (लिपिक) रोहिदास लक्षण जगताप (लिपिक) यांच्या हातावर ३९ लाख ८५ हजार रुपये आढळून आले.

      सदर संस्थांचे वैधानिक लेखापरीक्षण अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. सदर लेखा परीक्षक यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था अकोले यांना कळविले आहे.

     या पत्रात तीनही व्यक्तींना ३१ ऑगस्ट पर्यंत सदर रक्कम भरण्याची सूचना करण्यात आली. त्या नुसार सचिव साबळे व दीपक परशुरामी यांनी प्रत्येकी १३ लाख रुपये असा २६ लाखांचा भरणा केला आहे तर रोहिदास जगताप यांनी १ लाख दहा हजार भरले आहेत. उर्वरित ११ लाख ९० हजार त्यांच्याकडे बाकी आहे. मात्र ही रक्कम या लोकांनी अनेक वर्षे हतावर वापरली असल्याने त्या रकमेचे व्याज धरून ६० लाख रुपये होतात असे तक्रारीत म्हटले आहे.

    सदर तक्रारीत सयाजी मुरलीधर देशमुख, चंदू नाना पवार, भाऊसाहेब प्रभाकर देशमुख, रमेश सोपान देशमुख, सुरेश नानासाहेब देशमुख यांच्यासह अशा दीडशे सभासदांच्या सह्या आहेत.

----- Advertisements -----

    "कोतूळ सेवा सोसायटीत सुमारे चाळीस लाखांची अफरातफर झाली या बाबत तक्रार आली आहे. या संस्थेचे मागील व्यवहार तपासणी करून दोषींवर कारवाई होईल असे अकोले दुय्यम निबंधक सहकारी संस्थाचे अमोल वाघमारे यांनी सांगितले. तर वैधानिक लेखापरीक्षण अहवालात ही बाब समोर आली. तातडीने संबंधित कर्मचारी यांना रकमेचा भरणा करण्याची सुचनाही केल्या आहेत त्या पैकी २७ लाख दहा हजार भरले ११ लाख नव्वद हजार वसूल करण्याचे काम सुरू असल्याचे मनोज देशमुख संचालक यांनी सांगितले.

स्वत:ची किंमत ओळखली, तर जग जिंकल्यासारखे आहे.

संत एकनाथ
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin