मेहेंदुरी, म्हाळादेवी, निळवंडे रस्त्याचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे झाल्याने ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांना अतोनात त्रास सहन करण्याची वेळ आलेली आहे. याबाबत वेळोवेळी प्रशासनास तोंडी तसेच लेखी तक्रार दाखल करूनही कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने अखेर अकोले तालुक्यातील म्हाळादेवी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात कठोर पवित्रा घेत संगमनेर जलसंपदा विभाग कार्यालयातच ठिय्या देताच अधिकारी चांगलेच खडबडून जागे झाले असून ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करत भ्रष्टाचाराची ही चौकशी केली जाणार असल्याचे आश्वासन देताच अखेर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.
अकोले तालुक्यातील म्हाळादेवी ग्रामपंचायत मार्फत मेहेदूरी, म्हाळादेवी, निळवंडे या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. या कामात साडे पाच कोटी रुपये मंजूर होते. परंतु कामात दिरंगाई करत मोठ्या प्रमाणात ठेकेदाराकडून भ्रष्टाचार झालेला आहे. तसेच केलेले खडीकरण आणि डांबरीकरण नीट झालेच नसून पूर्ण रस्ताच खड्डेमय झाल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांना अन्याय सहन करावा लागत आहे. अखेर ग्रामस्थांनी संगमनेर येथील जलसंपदा कार्यालयातच ठेकेदार आणि प्रशासनाच्या विरोधात ठिय्या देत घोषणाबाजी केली.

प्रदीप हासे यांच्या नेतृत्वाखाली भरत हासे उल्हास हासे, राणी मुंढे, सत्यभामा हासे, विठ्ठल हासे श्रीकृष्ण मुंढे, सुहास मुंढे, शरद हासे ,ज्ञानदेव हासे, बाळासाहेब गायकवाड, उल्हास हासे, शशिकांत हासे, दसरथ हासे, मुरलीधर हासे, अमित हासे, जितेंद्र मुंढे, सोमदत्त मुंढे आदि ग्रामस्थांनी कार्यालयातच ठिया देत ठेकेदारांनी प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करत घोषणाबाजी दिली.
सदर कामाची चौकशी करून कामाचे बिले दाखवण्यात यावीत. तसेच आतापर्यंत झालेल्या कामाचा लेखाजोखा ग्रामस्था समोर जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता कुणाल चोपडे यांना निवेदन देण्यात आले.
प्रदीप हासे म्हणाले की, ठेकेदारावर कारवाई करावी, आमच्या मागण्या पूर्ण करून खर्चाचा लेखाजोखाच ग्रामस्थां समोर सादर करावा. साडेपाच कोटी रुपयाचे काम आज पूर्णतः खड्ड्यात गेले असून दोनच महिन्यात रस्त्याची वाट लागली आहे . ठेकेदार संतोष भापकर पारनेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अधिकारी, ठेकेदार यांना फोन केला असता ते फोनच उचलत नाही. शांताराम संगारे म्हणाले की, रस्त्या बाबत दिलेले आश्वासन हवेत विरले असून गाड्यांचे अतोनात नुकसान होत आहे. चालणे मुश्किल झाले आहे. आमच्या मागण्याची तात्काळ दाखल घ्यावी तर सुभाष हासे म्हणाले की ग्रामस्थांनी किती दिवस अन्याय सहन करावा. युवा कार्यकर्ते विशाल हासे म्हणाले की कॅनोलमध्ये शेतकरी बाधित झाले. शाळकळी मुलांना अतोनात हालचाल सहन करावे लागत आहे. येत्या काही दिवसात रस्ता पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देताच अधिकारी वर्ग मात्र खडबडून जागा झाला. ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.
काय म्हणाले अधिकारी ?ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे तसेच कामाबाबत विलंब होत असल्या कारणाने उपविभागा मार्फत सदर ठेकेदारास वीस दिवसापूर्वीच प्रतिदिन पाच हजार रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करणे बाबत शिफारस करण्यात आली आहे . असे ऊर्ध्व प्रवरा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी सांगितले.
उपविभागीय अभियंता कुणाल चोपडे म्हणाले की, यापूर्वीच ठेकेदरावर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव व शिफारस कार्यालय मार्फत करण्यात आलेली आहे. अटी व शर्तीनुसार दोन वर्षाचा कालावधी असून पावसाळा संपल्यानंतर सदर रस्ता सुधारणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी लेखी आश्वासन दिले.
जीवन हे एक प्रवास आहे, गंतव्य नव्हे.
महात्मा गांधी