ब्रेकिंग न्यूज :
भारत

वयोवृद्ध दाम्पत्यास मारहाण ; सव्वादोन लाखांचे दागिने लुटले; मनोहरपूर फाटा परिसरात चोरट्याची दहशत,

Blog Image
एकूण दृश्ये: 126

वयोवृद्ध दाम्पत्यास मारहाण ; सव्वादोन लाखांचे दागिने लुटले; मनोहरपूर फाटा परिसरात चोरट्याची दहशत, 

   अकोले ( प्रतिनिधी)

संगमनेरकडे लग्नासाठी निघालेल्या वयोवृद्ध दाम्पत्यावर एका भामट्याने हल्ल्या करीत तब्बल अडीच लाखाचे दागिने लुटून फरार झाल्याची घटना मनोहरपूर फाटा परिसरात घडली. अज्ञाताने थेट या वृद्ध दांपत्यावर हात उगारत मारहाण केली आणि गळ्यातील सोन्याचे गंठण ओढून नेले. अचानक झालेल्या या हल्ल्यात फिर्यादी पती पत्नी रस्त्यावर कोसळून जखमी झाले. अवघ्या काही क्षणांत चोरट्याने तब्बल २ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास करत पोबारा केला. ही धक्कादायक घटना गुरुवार, दि. १२ रोजी सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास मनोहरपूर फाटा येथे घडली.

 या प्रकरणी तुकाराम भिकाजी नवले (वय ७३, रा. इंदोरी, अकोले) यांनी अकोले पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या जबाबावरून लक्ष्मण चंद्रकांत चाळके (वय ३२, रा. वाळवा रोड, चांदोली वसाहत, आष्टा, जि. सांगली) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे व सहकारी अनिल भारती यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत आरोपीचा शोध घेत त्याला तात्काळ जेरबंदही केले.

 

 

----- Advertisements -----

 

शिकत रहा, कारण ज्ञान हेच आपले खरे सामर्थ्य आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin